भांड्यावरील नावाने फुटले "बिंग' 

भांड्यावरील नावाने फुटले "बिंग' 

जळगाव : तांबापुरा भागातील बिस्मिल्ला चौकात घरफोडी करून लंपास केलेली पितळी भांडी विकायला निघालेला चोरटा आज एमआयडीसी पोलिसांच्या तावडीत सापडला. भांड्यावरील नावावरून तांबापुरातील जमीलाबी यांच्याच घरात या भामट्याने चोरी केल्याचे उघड झाले. अटकेतील फिरोज शेख इकबाल (वय 22) याला न्यायालयात हजर केल्यावर त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. त्याचे उर्वरित तीन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

तांबापुरातील बिस्मिल्ला चौकातील रहिवासी जमिलाबी शेख इस्माईल (वय 54) या आजारी असल्याने 10 नोव्हेंबरला उपचारासाठी शिर्डीला गेल्या होत्या. दरम्यान, रविवारी (ता. 24) त्यांच्या शेजाऱ्यांनी दूरध्वनीवरून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी जवळच राहणारा मुलगा फारुख याला घरी जाऊन तपासणी करण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी त्या घरी आल्यानंतर पाहणी केली असता घरात ठेवलेले 25 हजार 400 रुपये रोख, 3 हजार रुपये किमतीची 2 ग्रॅम सोन्याची अंगठी, 9 हजाराची 6 ग्रॅम सोन्याची पोत आणि 3 हजार रुपये किमतीचे पितळाची भांडी असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग पाटील तपास करीत आहेत. 

...अन्‌ उघड झाला प्रकार 
अटकेतील भामटा शेख फिरोज शेख इकबाल हा पितळी भांडी घेऊन भंगारात विक्रीसाठी जात होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपासाधिकारी आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत यांनी संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या ताब्यातील भांड्यांवर तांबापुरातील जमिलाबीच्या मुलाचे नाव असल्याचे आढळून आल्याने घरफोडीचा उलगडा झाला असून या गुन्ह्यात फिरोज सोबत त्याचे तीन साथीदार आणखी असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com