esakal | कोरना'मुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव

बोलून बातमी शोधा

corona

खेड्यामधील अनेक जण रोजगारानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक, सुरत भागात स्थाईक झाली आहे. सध्या जगभरात 'कोरोना' या विषाणूने कहर केला आहे. त्यामुळे मुबंई, नाशिक, पुण्यातील स्थाईक लोक बचावासाठी आपल्या मुळ गावांकडे येतांना दिसत आहे. त्यामुळे खेड्यात गर्दी वाढलेली दिसत आहे.

कोरना'मुळे चाकरमान्यांची गावाकडे धाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भडगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी फारपुर्वीच "खेड्याकडे चला.." असा संदेश दिला होता. पण त्यानंतरही खेड्यामधील लोकांचा शहराकडेच अधिक ओढा आहे. त्यामुळे शहरे लोकसंख्यने फुगताना दिसत आहे. मात्र 'कोरोना' मुळे महात्मा गांधीच्या 'त्या' संदेशानुसार शहरात विसावलेले लोक पुन्हा आपल्या मुळ गावाकडे म्हणजेच खेड्याकडे येतांना दिसत आहे. यामुळे कामाच्या व्यापामुळे गावाकडे ढुंकूनही न पाहणार्याची गावांमधे गर्दी  झाल्याचे पहावयास मिळत आहे. 

हेपण वाचा -"कोरोना इफेक्‍ट' : धुळ्यातील 20 हजार रहिवासी "माहेरी'! 

खेड्यांमधे वाढतेय गर्दी
मुबंई व पुण्यात कोरोना चे रूग्ण आढळून आल्याने धास्तावले ग्रामीण भागातील नागरीक ही आपल्या मुळ गावांकडे धाव घेतांना दिसुन येत आहे. एसटी, रेल्वे बंद असल्याने ही चाकरमाने मिळेल त्या साधनाने गावात दाखल होत असल्याचे चित्र आहे. काहींनी चक्क मोटरसायकलवर एवढ्या लांबून प्रवास केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खेड्यामधे बाहेरून आलेल्या लोकांची गर्दी झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा लोकांची यादि बनविण्याबाबत पोलिस पाटलांना सुचना दिल्या आहेत. 

आता गावाची आठवण!
एरवी रोजगारानिमित्त बाहेर राहणारे लोक गावाकडे येणे ही विसरले होते. मात्र कोरोनामुळे ही चाकरमाने आपला रोजगाराला ब्रेक लावून आपल्या  गावात आली आहेत. त्यांना त्यांचे घरचे बोलवून ही ते येत नसत ते ही आता गावात आले आहेत. त्यामुळे घरचे मंडळीही सुखावले आहेत. तर गावात आपल्या घराच्यांकडे ढुकुंनही न पाहणार्याना कोरोना मुळे अखेर गावाचाच आश्रय घ्यावा लागल्याच्या प्रतिक्रिया गावकर्याकडुन व्यक्त होत आहे.

बाहेरचे संशयाच्या भोवर्यात....
यापूर्वी गावातील मुंबई, पुण्यात राहणारे घरी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी मित्र परीवार गर्दी करायचे. विदेशात राहणार्याच्या भोवती तर गराडाच असायचा पण आता त्यांना भेटण्याचे 'ते' टाळतांना दिसत आहे. ते संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांचा मित्र परिवार, शेजारीच 'ते' बाहेरून आल्याची माहिती प्रशासनाला देत आहे. त्यामुळे कोरोनामुळे परिस्थिती पुर्णपणे बदलली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.