भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या उपनिरीक्षकास निलंबित करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नाशिक : श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील एका इसमाच्या घरी जाऊन दमदाटी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने माजी मंत्री छगन भुजबळ यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्याबद्दल शिवीगाळ केली.

याप्रकरणी उपनिरीक्षक महावीर जाधव यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि कारवाईसाठीचे निवेदन दिले. 

गडकरी चौकातील नाशिक परिक्षेत्र कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, भालचंद्र भुजबळ, संदीप सोनवणे, प्रदीप वैद्य, नरेंद्र सोनवणे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

 या निवेदनानुसार, शुक्रवारी (ता.8) पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीमराव बापूराव नलगे (रा. कोसे गव्हाण, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) यांच्या घरी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव गेले आणि त्यांना दमदाटी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेशी काहीही संबंध नसतांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने अवमानकारकरित्या शिवीगाळ केली. तरी, महावीर जाधव यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

घटनेच्या संभाषणाची रेकॉर्डिंग सीडी विशेष पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आली. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जयवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक सतिश माथूर यांच्याकडे श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यावर तातडीने निलंबन करण्याची मागणी करून त्यांनाही याबाबतचे पुरावे दिले आहेत. 
 
Web Title: marathi news bhujbal issue