कलेक्‍टरसाहेब, गंगापूर धरणांवरच्या बोटी गेल्या कुठे ? भुजबळांचा सवाल

residentional photo
residentional photo

नाशिक ः सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या गंगापूर धरणावरील जागतीक दर्जाच्या 48 बोटी कुठे आहेत. हे बैठकीत कुणाला माहीती नसेल तर कलेक्‍टरसाहेब, "बोटी चोरीला गेल्या असतील. मग गुन्हे दाखल करा. कोट्यवधीच्या बोटी अडीच वर्षापासून धरणावर वापराविना पडून असलेल्या अनास्था हा सरकारी कोट्यवधी रुपयांचा अपव्यय नाही का अशा शब्दात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. 

श्री भुजबळ यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर नाशिकला जिल्हाधिकारी कायार्लयात बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसह विविध सरकारी यंत्रणेसमोर कामातील दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते. बोटीबाबत बैठकीत कुणालाच सांगता आले नाही, बैठक संपतेवेळी दूरध्वनीवरुन माहीती घेत, धरणावर 12 बोटी शिल्लक असल्याची माहीती श्री भुजबळ यांना दिली गेली. 
टॅकर मिळण्यातील अडचणी, रस्त्याची दुरावस्था , पीककर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या, मांजरपाडा, बोटक्‍लब, कलाग्राम यासह अडीच वषार्तील प्रलंबित विषयावर चर्चा केली. सुरुवातीलाच टंचाई असल्याने तालुक्‍यात पाण्याचे टॅकर सुरु करण्यात प्रशासनाकडून लवकर प्रतिसाद मिळत नाही त्याविषयी नाराजी व्यक्त केली. 

10 हजाराचा मोर्चा आणीन 
मांजरपाडा वळण योजनेच्या कामाबाबत अडीच वर्षापासून प्रगती नाही. 303 मीटरचे काम बाकी आहे. लोकांना किती दिवस पाण्यापासून वंथित ठेवणार त्यांना दिलेले शब्द तरी पाळा, 2019 पयर्त हे काम पूणर्‌ झाले नाही तर 10 ते 20 हजार लोकांचा मोर्चा घेउन येईन. मग जिल्हाधिकारी सीईओ आणि तुम्ही सगळे लोकांपुढे कारण सांगत बसा.असा इशाराही दिला. मांजरपाडा वळण योजनेच्या अनुषंगाने पूल व इतर कामांबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्या दिरंगाईबाबत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. 

रस्त्याचे मला सांगणार का ? 
जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विचारणा केली असता, महामार्ग विभागाचे आधिकारी गैरहजर होते. बांधकाम विभागाच्या कर्मचारी पी-1, पी-2 श्रेणी अशा रस्त्याच्या श्रेणीच्या अडचणी सांगून रस्ते दुरुस्ती करणे कसे अवघड आहे. हे सांगू लागल्याने उद्विग्न होत श्री भुजबळ यांनी अनेक वर्षे राज्याचे बांधकाम खाते सांभाळले. रस्ते केले. आता तुम्ही मला सांगणार का, अडचणीपेक्षा निदान पेपर वाचून तरी, रस्त्याची माहीती घ्या. त्यातून मार्ग काढा. अशा शब्दात नाराजी मांडली. 

गृह राज्यमंत्री खूप अभ्यासू 
गृह राज्य मंत्री खूप अभ्यासू आहेत.त्यांच्याबद्दल काय बोलू ? अशा शब्दात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांना चिमटा काढला. 
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेतील संशयितांचा सनातन संस्थेशी संबध नसल्याचे श्री केसरकर यांनी वक्तव्य केले. त्यावर पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी 
हा चिमटा काढला. 

तक्रारींचा पाढा 
रस्त्यांची वाट लागली रस्ते नादुरुस्त 
अर्ध्यावर जिल्ह्यात टंचाई टॅकर द्यावे 
हात जोडतो, पेपर वाचून अपडेट रहा 
2019 पर्यत मांजरपाडा काम पूर्ण करा 
वनहक्क प्रलंबित खटले निकाली काढा 
पीककर्जासाठी आत्महत्यांची वेळ आली 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com