कोरोनाला घालविण्यासाठी... भुसावळच्या डॉक्टरांचा `जय हो` व्हिडीओ ! 

श्रीकांत जोशी  
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना सलाम तर आहेच शिवाय 
लोकांनी काय करावे हे सहजगत्या हसत खेळत सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवाय डॉक्टरही आपल्या सारखेच असतात ही भावना व्हिडिओ पाहिल्यावर येते. त्यातून आपुलकीची भावना निर्माण होते. या व्हिडिओला अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यातील इतर डॉक्टरही आमचे कौतुक करत आहे. 
-डॉ. प्रीती भारुडे ः स्त्री रोग तज्ज्ञ, भुसावळ. 

भुसावळ : कोरोनाला घालविण्यासाठी जनजागृती व्हावी व कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांना सलाम करावा या भावनेतून येथील स्री रोग तज्ज्ञांच्या असोसिएशन मधील २२ डॉक्टरांच्या टिमने जय हो हा व्हिडिओ तयार केला आहे. या सर्वांनी नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून आपापल्या घरुन या प्रेरणादायी व्हिडिओची निर्मिती केली आहे. सध्या सोशल मीडियाला तो आवर्जून पाहिला जात आहे. 

नक्की वाचा : जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 
 

भुसावळला स्त्री रोग तज्ज्ञाची ओबीजीआय असोसिएशन असून त्यांनी ०हा व्हिडिओ तयार केला. याची मूळ संकल्पना डॉ. प्रीती भारुडे यांची असून मूळ ए.आर. रहेमान यांच्या जय हो या गाण्याची चाल घेत डॉ. जान्हवी पाटील यांनी हे गीत गायले आहे. जय हो....जा जा जा कोरोना तू चला जा..सारे जग हे तु चला जा म्हणत कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांना मानाचा मुजरा आदी गोष्टी २२ डॉक्टरांनी आपल्या नृत्यातुन दाखवल्या आहे. डॉ. सुजाता केळकर यांनी माऊथ ऑर्गनवर काही ओळी सादर केलेल्या. यात ६७ वर्षांचे ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप नाईक यांनीही नृत्य केले आहे. हे विशेष होय. त्यांनीच या व्हिडिओच्या सुरवातीला निवेदन केले आहे. डॉ. नाईक म्हणतात कोरोना समुळ नष्ट करण्याचा ज्यांनी विडा उचललेला आहे अशा कोरोना योध्यासाठी ही गीतसुमनांजली आम्ही सादर केली. आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने यात काही त्रुटी असु शकतात पण आमच्या वेदना, भावना व सर्मित प्रयत्न शंभर टक्के खरे आहेत. सर्व डॉक्टरांनी घरीच रेकॉर्डिंग करुन डॉ. प्रीती भारुडे यांच्या कडे पाठविले. त्यांचे पती हृदय रोग तज्ज्ञ डॉ. संदीप भारुडे यांनी एडिटिंगची जबाबदारी पार पाडली. 

आर्वजून पहा : नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusaval Awareness to drive Corona doctars song