जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 

sakal breaking
sakal breaking


जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या दहा रूग्णांमुळे जळगाव जिल्ह्याने कोरोना बाधितांचे शतक पुर्ण केले आहे. 
कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दोन दिवसांपासून आकडा मोठा येत असून, यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता देखील वर्तविण्यात येत आहे. यामुळे चार दिवसांपुर्वी पन्नासी पार करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात चार दिवसात नवे पन्नास रूग्ण आल्याने जिल्ह्यातील आकडा शंभर झाला आहे. आज पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील आंबेडकरनगर 21 वर्षीय तरूण, गिरडरोड येथील 49 वर्षीय पुरूष, अंतुर्ली येथील 50 वर्षीय पुरूष अशा तीन तर अमळनेर येथील आमलेशानगरातील सहा व माळीवाडा येथील एक अशा सात व्यक्तींचा समावेश आहे. निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 16, भडगाव येथील एक व अमळनेर येथील 51 व्यक्तींचा समावेश आहे. 

चौदा जणांचा मृत्यू 
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्यसा वाढत असून आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 100 इतकी झाली आहे. यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. तरी देखील जिल्ह्यातील मृत्यूचा दर चौदा टक्‍के आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com