भुसावळला ‘कोरोना’ सक्रिय; पालिका मात्र निष्क्रिय! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

‘कोरोना’बाधित परिसर ‘सील’ करण्यात आले असून, या ठिकाणी अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी ॲप दिले जाणार आहेत. तसेच काही स्वयंसेवकांची नियुक्ती करून नागरिकांच्या मागणीनुसार बॅरिकेट्सजवळून अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जाईल. बाधित क्षेत्रात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. 
- करुणा डोहाळे, मुख्याधिकारी, भुसावळ 

भुसावळ : शहरात ‘कोरोना’ सक्रिय झाला झाला. पाच जणांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यातील दोघांचा बळी गेला. यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबत पालिका प्रशासन निष्क्रिय दिसून येत आहे. बाधित क्षेत्रात सॅनिटायझर फवारणीसह अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल, तर नगरसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

क्‍लिक कराः त्या' कोरोनाबाधिताने दिला खोटा पत्ता 
 

शहरातील समतानगर, पंचशीलनगर, शांतीनगर आणि सिंधी कॉलनी भागात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी समतानगर आणि पंचशीलनगरातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बहुतांश क्षेत्रात फवारणी करण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून समतानगर परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. मात्र, तेथे दूध, भाजीपाला तसेच किराणा साहित्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिक चोरट्या मार्गाने बाजारपेठेत जाऊन अत्यावश्यक गरजा पूर्ण करतात, ही बाब धोकादायकच आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...कोरोनाग्रस्तांची संख्या एकतीसवर ! 
 

नगरसेवकांनी केले रस्ते ‘सील’ 
पंचशीलनगर परिसर ‘सील’ करण्यासाठी पालिका कर्मचारी न पोचल्याने सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन हातगाड्या रस्त्यात आडव्या लावून व बांबू बांधून या परिसराला ‘सील’ केले आहे. नगरसेवक अमोल इंगळे यांनी पाइप तसेच बांबूच्या सहाय्याने रस्ते बंद केले. 

गेल्या तीन दिवसांपासून समतानगर परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली नाही, तसेच अत्यावश्यक सेवाही नागरिकांना मिळत नाहीत. त्यामुळे बहुतेक नागरिक चोरट्या मार्गाने बाजारपेठेत जाऊन साहित्य खरेदी करतात. यामुळे कुणाचा धोका शहरभर पसरू शकतो. शासनाने याकडे लक्ष दिल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करेन. 
- उल्हास पगारे, नगरसेवक 

 

नक्की वाचा :जोशीपेठेत साडेचार हजार नागरिकांची तपासणी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Bhusaval Corona’s active Municipality inactive!