त्या' कोरोनाबाधिताने दिला खोटा पत्ता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

नाबादचा पत्ता देण्याऐवजी जोशीपेठचा पत्ता दिल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जोशीपेठ पूर्णत: सीलबंद केला असून, परिसरात तपासणी करण्यात येत आहे. 

जळगाव  : शहरात रविवारी (ता. 26) पॉझिटिव्ह आढळून आलेला 26 वर्षीय तरुण कुटुंबीयांसह जैनाबाद परिसरात राहत असताना त्याने रुग्णालयात दाखल होताना जोशीपेठ, बागवान मोहल्ल्यातील त्याच्या शालकाच्या घराचा पत्ता दिला होता. परिणामी, प्रशासनाने हा परिसर पूर्ण सील केला असून, जैनाबादेत पिरुबाबा दर्ग्याजवळ तो राहत असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा सर्व खटाटोप एका नगरसेवकाच्या मध्यस्थीने झाल्याचे समोर येत आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...कोरोनाग्रस्तांची संख्या एकतीसवर ! 
 

शहरात 26 वर्षीय बंगाली कारागीर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. जोशीपेठेतील त्याच्या शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा बंगाली कारागीर मुळात जैनाबाद-कांचन नगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याला सर्दी-पडसे तापाचा त्रास झाल्यानंतर तो त्याच्या शालकाच्या घरी आला. तेथे एका डॉक्‍टरकडे तपासणीही झाली. नंतर स्थानिक नगरसेवकाच्या माध्यमाने त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे जैनाबादचा पत्ता देण्याऐवजी जोशीपेठचा पत्ता दिल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जोशीपेठ पूर्णत: सीलबंद केला असून, परिसरात तपासणी करण्यात येत आहे. 

क्‍लिक कराः जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 
 

"अमळनेर' होण्याची भीती 
"कोरोना'बाधित रुग्ण हा मुळात जैनाबाद-कांचननगर परिसरात वास्तव्यास असून तो मेस चालवतो. सराफ बाजारात कामावर असणाऱ्या बंगाली कामगारांना डबे पोचवण्याचे काम तो आणि त्याची पत्नी करते. आजारी पडल्यानंतर तो शालकाकडे आला आणि तेथून रुग्णालयात दाखल झाला आहे. तो पत्नीसह वास्तव्यास असलेला परिसर, गल्ली आणि ज्या लोकांच्या तो संपर्कात आला आहे. त्याची अचूक माहिती नसल्याने शहरातही अमळनेरसारखी चूक होऊन कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

 

नक्की वाचा :  डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Patient rong Address