विशेष रेल्वेने जिल्ह्यातून बाराशे मजूर लखनऊला रवाना !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बसेसच्या साहाय्याने मजूरांना भुसावळ बसस्थानकावर उतरविण्यात येऊन, तेथून सोशल डिस्टन्स राखत रेल्वे स्थानकाकडे सोडण्यात आले. 

भुसावळ  : जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांपैकी हजार ते बाराशे स्थलांतरीत मजुरांना भुसावळहून लखनऊला विशेष रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्देशानुसार ही प्रक्रिया आज (ता.६) राबविण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन बंदोबस्त ठेवला होता. 

क्‍लिक कराः शाहीर हरीभाऊ खैरनार यांचे निधन...एका तासात लहान बंधूचा देखील मृत्यू 
 

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. केंद्र शासनाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी सवलत दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत सदर मजूरांना लखनऊ येथे पाठविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. मजूरांची वैद्यकीय तपासणी करुन यादीनिहाय त्यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. आज सकाळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अमर स्टोअर्स पर्यंत बॅरिकेट्‌स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बसेसच्या साहाय्याने मजूरांना भुसावळ बसस्थानकावर उतरविण्यात येऊन, तेथून सोशल डिस्टन्स राखत रेल्वे स्थानकाकडे सोडण्यात आले. 

नक्की वाचा :  दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना ! 
 

१८ कोचची व्यवस्था 
भुसावळ येथून लखनऊसाठी सायंकाळी सहाला विशेष गाडी रवाना झाली. या गाडीला १८ कोच जोडण्यात आले असून, सोशल डिस्टन्स राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात ५४ प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडी रवाना होईपर्यंत प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेऊन फलाटावरच बसविण्यात आले होते. यावेळी आआरसीटीसी तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 

आर्वजून पहा : "लॉकडाउन'चा परिणाम..विजेच्या मागणीत तब्बल तीनशे मेगावॉटने घट! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusaval special train twelve hundred laborers left the district for Lucknow