esakal | दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना ! 
sakal

बोलून बातमी शोधा

दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना ! 

कोरोनाची साथ उदभवू नये म्हणून भारत सरकारने गेल्या 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू केले आहे. या काळात नागरीकांना बाहेर जाण्यास मनाई असतांना देखील या काळात मेहूणबारे पोलीस ठाण्यात हातभट्टीच्या दारूला उत आला आहे.

दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- एकीकडे दारू विक्रीच्या दुकानांना शासनाने परवानगी दिल्याने दारु दुकानांसमोर दारू घेण्यासाठी रांगा लागलेल्या असतांना दुसरीकडे गावठी हातभट्टींनाही उत आला आहे. चाळीसगाव तालुक्यात गावठी हातभट्टीने कहर केला असून लॉकडाऊन लागल्यापासून पोलीसांनी हातभट्टीची दारू उद्धवस्त करण्याचा विडाच उचलला आहे.आजपावेतो वेळीवेळी केलेल्या कारवायांत लाखो रूपये किंमतीची हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली.

क्‍लिक कराः उन्हातान्हात लाठी खात मिळवली बाटली ;तळीरामांनी लावल्या लांबच लांब रांगा 
 

पोलीस उपविभागीय अधिकारी,यांच्या चाळीसगाव कार्यालयातील ईआरटी पथकाने (ता.6 )रोजी तांबोळे शिवारात दारु अड्ड्यावर धाड टाकून सुमारे 47 हजार रूपये किंमतीची दारू नष्ट केली.तांबोळे शिवारात झाडा झुडपांमध्ये विजय पाटील हा गैरकायदा हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. त्यांच्या या आदेशान्वये पोलीस हवलदार प्रशांत पाटील, नंदकिशोर निकम, संजु मोरे, गोरख चकोर, मुकेश देशमुख यांच्या पथकाने काल(ता.6 )रोजी 2 वाजता लपत छपत जावून छापा टाकला असता विजय पाटील हा गावठी दारु तयार करीत असल्याचे आढळून आले.पथकाने 45 हजार रूपये किंमतीचे 1500 लिटर गुळमिश्रीत कच्चे पक्के दारू रसायन, 1200 रूपये किंमतीचे नवसागर मिश्रीत रसायन, 375 रूपये किंमतीची 15 लिटर तयार दारू व 40 हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण 86 हजार 575 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. जप्त केलेले दारू जागीच नष्ट केली. बापु सोनवणे नामक शेतकऱ्याच्या शेतात ही हातभट्टी आढळून आली.या प्रकरणी संजु मोरे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टी चालक विजय पाटील यांचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला साथरोग नियंत्रण कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

आर्वजून पहा : रईसजाद्यांना मद्याची खरेदी भोवली ;29 लाखांची गाडीत 37 हजारांची दारु जप्त 
 

मेहुणबारे दोन महीन्यात 43 कारवाया

कोरोनाची साथ उदभवू नये म्हणून भारत सरकारने गेल्या 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू केले आहे. या काळात नागरीकांना बाहेर जाण्यास मनाई असतांना देखील या काळात मेहूणबारे पोलीस ठाण्यात हातभट्टीच्या दारूला उत आला आहे. एकट्या मेहूणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गेल्या दोन महिन्यात म्हणजे 16 मार्च ते आजपावेतो पोलीसांनी गावठी हातभट्टीचे 43 गुन्हे उघडकीस आणून 44 जणांना जेलची हवा घडवली. जवळपास 4 लाख रूपये किंमतीची16 हजार लिटर कच्चे रसायन व 1 हजार 83 लिटर तयार दारू जप्त करून ती जागेवरच नष्ट केली. गेल्या एप्रिल महिन्यातच पोलीसांनी भादंवि कलम 328 प्रमाणे 6 गंभीर गुन्हे दाखल केले. तसेच एक रिक्षाही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. या कारवायांमुळे हातभट्टीचालकांमध्ये भितीने गाळण उडाली आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असतांना देखील मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार होत असल्याचे या कारवायांवरून दिसून येते.

नक्की वाचा : सावद्यातून दुबई, इराणला केळी रवाना.. परदेशातून मागणीत वाढ

loading image
go to top