esakal | Video भुसावळचे ४७ यात्रेकरुंची उत्तरप्रदेशात भटकंती; अन्न, निवाऱ्यासाठी हाल
sakal

बोलून बातमी शोधा

corona uttar pradesh

अलाहाबाद, बुध्दगया, वाराणसी येथे जाऊन दर्शन घेतले. असे असतानाच कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने रेल्वे सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ही बातमी ऐकताच सर्व प्रवाशांनी आपला पुढील प्रवास रद्द करुन वाराणसी येथून रेल्वेने भुसावळला परत येण्याचा निर्णय घेतला,

Video भुसावळचे ४७ यात्रेकरुंची उत्तरप्रदेशात भटकंती; अन्न, निवाऱ्यासाठी हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ  : देशभरात प्रादुर्भाव होत असलेल्या कोरोनाचा फटका तालुक्यातून काशी येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या प्रवाशांना बसला आहे. मध्यप्रदेश सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे सर्व प्रवासी अहलाबाद येथेच अडकून पडले आहेत. त्याठिकाणी प्रशासनाकडूनही त्यांना कुठलीही मदत मिळत नसून त्यांना अन्न आणि निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

हेपण वाचा -"कोरोना इफेक्‍ट' : धुळ्यातील 20 हजार रहिवासी "माहेरी'! 

भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातून ४७ प्रवासी १३ मार्चला काशी एक्सप्रेसने उत्तर प्रदेशात तिर्थयात्रेसाठी रवाना झाले. त्यांनी अलाहाबाद, बुध्दगया, वाराणसी येथे जाऊन दर्शन घेतले. असे असतानाच कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने रेल्वे सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ही बातमी ऐकताच सर्व प्रवाशांनी आपला पुढील प्रवास रद्द करुन वाराणसी येथून रेल्वेने भुसावळला परत येण्याचा निर्णय घेतला, मात्र रेल्वे स्थानकावर गेले असता एकही गाडी नसल्याने त्यांनी स्थानिक ट्रॅव्हल्स करुन मार्गस्थ झाले. उत्तर प्रदेशातून मध्यप्रदेशाच्या सीमेवर आले असता त्यांच्या वाहनास अडविण्यात आले.

नक्‍की वाचा - आता...व्हॉट्‌ऍपद्वारेच द्या श्रद्धांजली; अंत्ययात्रेत न येण्याचे आवाहन

रेल्वेस्थानकावरून हुसकावले 

मध्य प्रदेश सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे हे प्रवासी पुन्हा अलाहाबाद येथील रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. तेथून झुसी रेल्वे स्थानकावर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथेही त्यांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र, यात्रेकरुंना कुठेच निवाऱ्याची व्यवस्था होत नसल्याने त्यांनी एका ओसाड जागेवर झाडाखाली आपले ठाण मांडले. गेल्या दोन दिवसात त्यांच्याकडे असलेली शेव, मुरमुरे आदी शिदोरीही संपली असून, केवळ पाणी पिऊन दिवस काढावे लागत आहे. असे असताना त्यांना कुठूनही मदतीचा हात मिळत नसल्याने यात्रेकरुन पुरते हैराण झाले आहेत.

मध्य प्रदेशाच्या सीमा बंद केल्यामुळे आम्ही उत्तर प्रदेशातच अडकून पडलो आहे. तेथेही राहण्याची अन्‌ खाण्याची कुठलीही व्यवस्था होत नाही. जिथेही जा सर्वच आम्हाला हाकलून लावत आहे. याबाबत आमदार संजय सावकारे आणि खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
- दिलीप वारके, यात्रेकरु.
 

loading image