कोट्यवधींचे क्रीडा संकुल वनवासात 

चेतन चौधरी
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

सार्वजनिक बांधकामने काम पूर्ण केले नसल्याने त्याचे हस्तांतरण झालेले नाही. वापराअभावी क्रीडा संकुलाची टारगटांकडून तोडफोड करण्यात आली असून, संपूर्ण पटांगणावर बाभळाची झाडे वाढली आहेत.

भुसावळ: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या क्रीडा संकुलाची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. याठिकाणी बाभळाची झाडे वाढली असून, क्रीडा संकुल आहे की, बाभुळवन हेच लक्षात येत नाही. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 
 

ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य निर्माण होऊन खेळाडू निर्माण व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वीच जुगादेवी परिसरात कोट्यवधी रुपये खर्चातून तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकामने काम पूर्ण केले नसल्याने त्याचे हस्तांतरण झालेले नाही. वापराअभावी क्रीडा संकुलाची टारगटांकडून तोडफोड करण्यात आली असून, संपूर्ण पटांगणावर बाभळाची झाडे वाढली आहेत. याठिकाणी बॅडमिंटन हॉल, २०० मीटर धावपट्टी, कबड्डी, हॉलीबॉल साठी मैदान आणि सुरक्षा रक्षकासाठी स्वतंत्र कॅबीन तयार करण्यात आली आहे. या हॉलमधील बसवण्यात आलेल्या फरशा, प्रसाधन गृहाची तोडफोड झाली आहे. तर दरवाजे आणि खिडक्या तोडून लंपास करण्यात आल्या आहे. 

नक्की वाचा :आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब ! 
 

मद्यपींचा अड्डा 
मुळातच क्रीडा संकुल शहरापासून लांब असल्याने तिथे कुणीही जात नाही. सद्यःस्थितीत हे संकुल खेळाडूंसाठी बिनकामी ठरल्याने याठिकाणी मात्र, प्रेमीयुगल आणि मद्यपींचा अड्डा झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन क्रीडा संकुलाचा विकास करुन, सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. 
क्रीडानगरीची ओळख 
क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या भुसावळातील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावाजले आहेत. द. शि. विद्यालयाच्या मैदानावरच अनेक क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत. मात्र आता या मैदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याने खेळाडूंना हक्काचे मैदान मिळू शकत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांना प्रोत्साहन दिल्यास राज्य व देश पातळीवर चमकू शकतात. 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 
 

लोकप्रतिनिधींचा बोलघेवडेपणा 
शहरात विविध क्रीडा संघटना कार्यरत आहेत. या संस्थांतर्फे विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात, यावेळी शहरातील लोकप्रतिनिधींना बोलविण्यात येते, यावेळी हेच नेते मैदानी खेळांकडे वळण्याचे आवाहन करतात, मात्र दुसरीकडे खेळाडूंना हक्काचे मैदान मिळण्यासाठी कुठलाही पाठपुरावा करत नसल्याने, लोकप्रतिनिधींचा बोलघेवडेपणा दिसून येतो
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Billions of sports stydiom unfinished