आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

विनायकने गाडीत फ्रुटी पिण्यासाठी मागितली. ती घेवून देण्यासाठी विनायकची आईने आपातकालीन खिडकीजवळ उभा केले. फ्रुटी पर्समधून काढत असतांना आपातकालीन खिडकीतून विनायक हा बाहेर पडला.

जळगावः उत्तरप्रदेशवरून मुंबईला रेल्वेने आई व तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा हे प्रवास करत होते. आईला चिमुकल्याने फ्रुटीचा हट्ट केल्याने आई फ्रुटी घेण्यासाठी उभी राहताच आपातकालीन खिडकीजवळ असलेला चिमुकला थेट खिडकीतून पडल्याची घटना आज भादली रेल्वे स्टेशन जवळ घडली. या घटनेत चिमुकला अतिशय गंभीर झाला. मेंदूत रक्तश्राव झाला असून डाव्या हाताचे हाड मोडले आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येवून त्याला मुंबईला उपचारासाठी 
पाठविले. 

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 

मुंबई परिसरातील बोरीवली येथे शिवकुमार गुप्ता हे पत्नी पिंकी व मुलगा विनायक गुप्ता यांच्यासह वास्तव्यास आहे. पिंकी गुप्ता या भावाच्या लग्नासाठी उत्तरप्रदेशातील कटहरी हिराकत जि.जौनपूर येथे आल्या होत्या. लग्नसमारंभ आटपून पिंकी ह्या चिमुकला विनायक याच्यासह भाऊ सुरज गुप्ता याच्यासोबत त्या पुन्हा बोरीवलीला येण्यासाठी मुंबई छत्रपती लोकमान्य टर्मीनल या एक्‍स्प्रेसमने प्रवास करीत होत्या. रेल्वे गाडीने भुसावळ स्टेशन सोडले. यादरम्यान गाडीत विनायकने गाडीत फ्रुटी पिण्यासाठी मागितली. ती घेवून देण्यासाठी विनायकची आईने आपातकालीन खिडकीजवळ उभा केले. फ्रुटी पर्समधून काढत असतांना आपातकालीन खिडकीतून विनायक हा बाहेर पडला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

आर्वजून पहा : दुर्दैवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन्‌ कोसळले पन्नास फुट खोल दरीत 

डोळ्यासमोर घडलेल्या घटनेनंतर आई पिंकी यांनी आरडाओरड करत एकच हंबरडा फोडला. सोबतच्या प्रवाशांनी प्रकार लक्षात आल्यावर तत्काळ गाडीची चैन ओढून गाडी थांबवली. पिंकी भाऊ सुरजसोबत गाडीखाली उतरून विनायक पडल्या दिशेने धावत गेल्या. पडल्यामुळे चिमुकल्याच्या डोक्‍याला जोरदार मार बसल्याने विनायक बेशुध्द पडला होता. त्याला उचलले. यानंतर पुन्हा रेल्वेत बसल्या. जळगाव स्थानकावर रेल्वे पोहचण्यापूर्वी स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना खबर दिली होती. त्यानुसार गाडी रेल्वेस्थानक ावर पोहचताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राकेश पांण्डेय, पोलीस शिपाई अजय मून यांनी जखमी बालकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले. 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 

बालकाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत 
घटनेत विनायकच्या डोक्‍याला गंभीर ईजा झाली असून उजवा हात मोडला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार तसेच सिटीस्कॅन केले. यात मेंदूत रक्तश्राव झाला असल्याचे निदान झाले. त्यानुसार पुढील उपचारार्थ त्याला मुंबईकडे हलविण्यात आले होते. लोहमार्ग पोलीस राकेश पांण्डेय यांनी रुग्णवाहिका करुन देत तसेच चिमुकल्याचे वडील शिवकुमार गुप्ता यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत जखमीला मुंबईकडे रवाना केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon relway accidant by cildren injuard