गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 

गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 

वरणगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील अल्पवयीन तरुणीच्या प्रेमसंबंधामुळे आईवडिलांनी मुलीचे लवकरच लग्न लावून देण्याचे ठरविले. मात्र, प्रियकराने याची न्यायालयात तक्रार केल्याने, जन्मदात्या आईवडिलांना संताप अनावर झाला. अन मग काय आपल्या मुलीचा त्यांनी झोपेतच गळा दाबून हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. 

मिळालेल्या माहिती अशी की, तळवेल (ता. भुसावळ) येथील सतरा वर्षीय तरुणीस वायरमन गणेश निवृत्ती 
राणे याने फुस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. याची माहिती दीड वर्षापुर्वी मृत तरुणीच्या आईवडिलांना लागली होती. त्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्याने गणेश राणे याला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा केली होती. तरी सुद्धा गणेशने तरुणीला फुस लावून प्रेम प्रकरण पुन्हा पुढे सुरूच ठेवले होते. या प्रकरणामुळे हतबल झालेल्या आईवडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह दुसरीकडे जुळवला होता. परंतु गणेशला विवाह होऊ द्यायचा नाही, म्हणून त्याने  वधू व वर पक्षांविरुद्ध बालविवाह कायद्यांतर्गत भुसावळ न्यायालयात तक्रार केली असता, न्यायालयाकडून दोन्हीकडील कुंटूबाला कारणे दाखवा नोटिस देण्यात दिली होती. त्यामुळे हताश झालेल्या आईवडिलांनी बुधवारी (ता.19 ) रात्री टोकाचे पाऊल उचलत त्यांनी मुलगी झोपेत असताना तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. 

अंगावर जखमेच्या खुणा 
याबाबत तळवेलचे पोलिस पाटील यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात कळवले असता, मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. त्यावेळी डॉ. क्षितीजा हेंडवे यांना मृताच्या चेहरा व अंगावर संशयास्पद ओरखडण्याच्या बारा खुणा व जखमा आढळून आल्याने डॉक्‍टरांनी पोलिसांच्या लक्षात 
आणून दिले. यानंतर जिल्हा रुग्णालयात डॉ. एस. टी. चव्हाण व डॉ. निलेश देवराज यांच्या पथकाने शवविच्छेदन करून पुरावे पोलिसांकडे दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com