समर्थ नेतृवाच्या हाती देश असल्याने भाजपत 'इनकमिंग’ सुरू  : आमदार खडसे

live photo
live photo

भुसावळ : भाजपत नवनवीन चेहरे येत आहेत. त्यांचा आम्हालाही धक्का व आश्चर्य वाटते. ज्या कॉंग्रेसची शेकडो वर्षाची परंपरा आहे. वर्षानुवर्ष सत्तेत होते, ते आज भाजपत येत आहेत. त्याचे प्रमुख कारण या देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी सारख्या समर्थ व्यक्तीच्या हाती आहे. त्यांच्या शिवाय देशाला पर्याय नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपत इनकमिंग सुरू असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 
रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ विधानसभा क्षेत्र पेज प्रमुखांच्या सभेत आमदार खडसे बोलत होते. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहरप्रमुख पुरुषोत्तम नारखेडे, हाजी मुन्ना तेली, युवराज लोणारी, मनोज बियाणी यांसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आमदार खडसे म्हणाले की, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पेज प्रमुखांनी सक्रीय होऊन सरकारच्या योजना घराघरांत पोहचवा. तसेच गेल्या सरकारच्या काळात २६/११ चा हल्ला झाला. अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला. मात्र, तेव्हाच्या सरकारमध्ये धमक नव्हती. त्या उलट पुरी हल्ला व पुलवामा हल्ला झाला, तेव्हा समोरच्यांची दशक्रिया विधी व्हायच्या आत घरात घुसून बदला घेतला. खासदार रक्षा खडसे यांना भुसावळ मतदार संघाने गेल्यावेळी ५६ हजाराचा लिड दिला. आता एक लाखाच्यावर देण्याचा तुम्ही संकल्प केला आहे. त्यासाठी प्रत्येक बूथ मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान बऱ्हाटे, प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला. प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रवीण नरवाडे यांनी केले. 

मी पालकमंत्री असून मला सभेचे आमंत्रण नव्हते : आमदार सावकारे 
गेल्या लोकसभेच्या वेळी मी राष्ट्रवादी पक्षाचा आमदार व पालकमंत्री होतो. तरी देखील मला शरद पवारांच्या सभेचे आमंत्रण नव्हते. राष्ट्रवादीने माझे तिकीट कापले होते. तेव्हा आमदार खडसेंनी मला विचारले सांगा, कोणत्या पक्षाचे तिकीट हवे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस की राष्ट्रवादी. मी म्हटले भाऊ तुम्ही म्हणाल तसे! मी भाजपत गेलो. पूर्वी चौतीसशे मतांनी विजयी झालो होतो. भाजपत आल्याने ३४ हजार मताधिक्याने निवडून आलो असे आमदार सावकारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com