हतनूर धरणात २९ टक्केच जलसाठा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भुसावळ ः जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा हतनूर प्रकल्प एप्रिल महिन्‍यातच तळ गाठतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मे महिन्‍यात आर्वतन सुटेल की नाही या बाबतही प्रश्न निर्माण झालेला आहे. आजच्या तारखेत हतनूर धरणामध्ये केवळ २९ टक्के जलसाठा शिल्लक असून ही या परिसरासाठी चिंतेची बाब आहे. 

भुसावळ ः जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा हतनूर प्रकल्प एप्रिल महिन्‍यातच तळ गाठतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मे महिन्‍यात आर्वतन सुटेल की नाही या बाबतही प्रश्न निर्माण झालेला आहे. आजच्या तारखेत हतनूर धरणामध्ये केवळ २९ टक्के जलसाठा शिल्लक असून ही या परिसरासाठी चिंतेची बाब आहे. 

हतनूर धरणावर दीपनगरची वीज निर्मिती, रेल्वे स्थानक, भुसावळ शहराचा पाणी पुरवठा व अन्य महत्त्वाचे प्रकल्प अवलंबून आहेत. या सर्वांसाठी धरणाकडे आधीच जलसाठ्याचे आरक्षण केलेले असते. यावर्षी मात्र मुळात पाऊस कमी पडल्याने धरण क्षमतेप्रमाणे भरलेले नव्हते. आजची परिस्थिती पाहता आहे तो जलसाठा पावसाळ्या पर्यंत पुरविणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यंदा जलसंकटाचा सामना करावा लागतो की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

यावर्षी धरण व परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा लहान मोठे उद्योग व या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीवर परिणाम झाला आहे. आजच्या घडीला हतनून धरणात २९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. २०९ दश लक्ष घन मीटर पाणी साठा उपलब्‍ध आहे. त्यापैकी ७६ दशलक्ष घनमीटर जलसाठा हा उपयुक्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा ८ टक्यांनी कमी आहे. बाष्पीभवनाचा वेगही बराच असून यामुळे ०.१९ दशलक्ष घनमीटर पाणी कमी कमी होत आहे. 

धरण क्षेत्रातून वीज मोटारी लावून शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याने या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून विजेच्या मोटारी जप्त कराव्यात अशाही सूचना आहेत. या धरणात नेमका किती जलसाठा उपलब्‍ध आहे हेही नेमके सांगता येत नाही कारण संपूर्ण धरणात एकूण ५४ टक्के गाळ साठल्याचे अधिकृत रित्या सांगण्यात येते. यामुळे मे अखेर पर्यंत हा पाणी साठा पुरविणे जिकरीचे ठरणार आहे. 

बाष्पीभवनात वाढ 
धरण परिसराचे तापमान हे ४२ अंश सेल्सिअसच्या जवळपास असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही गतीने होत आहे. यावर हवी तशी उपाय योजना नसून पाणी वापर हा काटकसरीने करणे हाच एकमेव पर्याय आहे. या वर्षी देखील जलसाठा अपुरा असल्याने कृषी सिंचनासाठी पाणी देण्याचे टाळण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणजे रब्बीचा हंगाम वाया जाणार आहे. या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती या वर्षी पूर्णपणे नष्ट होणार आहे. 

Web Title: marathi news bhusawal hatnur dam 29 parsendge water lavel