म्हणूनच नाथाभाऊंवर ही वेळ... : गुलाबराव पाटील

khadse gulabrao patil
khadse gulabrao patil

जळगाव : नाथाभाऊंनी मला वडिलांसारखे प्रेम दिले. मात्र मुलगा कधी मानले नाही. त्यांनी मुलगा म्हणून माझा वापर केला असता; तर ही वाईट वेळ आली नसती. मी पक्का माणूस आहे; कधीही पाठीमागून हटलो नसतो; असा टोला शिवसेनेचे उपनेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. 
भुसावळमध्ये आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, की नाथाभाऊंनी अशा लोकांना सोबत ठेवले, पण त्यांचा रक्त ग्रुप चेक केला नाही. जर त्यांनी रक्त ग्रुप चेक करुन माणसं ठेवली असती, तर गुलाबराव पाटलांसारखा सच्चा माणूस कधी तुटला नसता. आणि तुटू शकणारही नाही. रक्षा खडसे या लोकसभेला उभ्या राहिल्या, तेव्हा मी त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी मागची दुश्‍मनी काढली नाही. कारण मला या देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच पाहायचे होते. 

न वाटणारे सरकार बनले 
गुलाबराव पाटील म्हणाले, की राजकारणात परखड दुश्‍मनी नको. ज्यादिवशी विचारांची लढाई सोडून निवडणूक लागेल. त्यावेळी मी तुमच्याविरूद्ध प्रचाराला येईन. मी प्रचाराला येईन. मी पुन्हा येईन; असा उपरोधीक टोला देखील त्यांनी लगावला. तसेच मह मनाने चालणारा माणूस आहे. मी कोणत्याही पक्षाचा आमदार मानत नाही. राजकारणात कधीच कोणी कोणाचा दुश्‍मन नसतो. कधी वाटलं होतं का तीन लोकांचं सरकार बनेल? असे म्हणताच हास्याची लाट पसरली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com