esakal | भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून

भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यात आला असता,  एका युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये रॉडने  वार केला. यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला.

भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


भुसावळ : साकेगाव (ता. भुसावळ) येथील दूध विक्री करणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर रॉडने वार करून दिवसाढवळ्या खून झाल्याची  घटना शहरातील कोळीवाड्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील साकेगाव येथील दूध विक्रेता नासिर बशीर पटेल वय 40 हा दूध विक्रीसाठी भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यात आला असता,  एका युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये रॉडने  वार केला. यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला. खुनाचे नेमके कारण अजून कळू शकले नाही, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश सुरडकर, यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन, सतीश सपकाळे, युवराज पाटील हे घटनास्थळी उपस्थित झाले. 

क्‍लिक कराः  सुळेंच्या भूमिकेमुळे "राष्ट्रवादी'चीच गोची! 
 

एक तास मृत्यू देह जागेवरच
घटना घडल्यापासून तब्बल तासभर रुग्णवाहिका न आल्यामुळे मृत्यूदेह घटनास्थळी एक तासापासून पडून होता. एका तासानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी  हलविण्यात आला. नसीर याच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

आर्वजून पहा : हार्ट ऑफ सिटी लाच पडलाय बेशिस्त वाहतुकीचा विळखा 
 

loading image