esakal | ओएलएक्‍स पे बेच दो...हे नाही तर फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

olx fraud

ओएलएक्‍स पे बेच दो...हे नाही तर फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील ४० बंगला भागातील युवतीला ओएलएक्स ऍप्लीकेशनवरुन स्कुटी घेण्यासाठी गुगल पे द्वारे २५ हजार रुपयांची फसावणूक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) दुपारी लक्षात आली. याबाबत बिहारच्या तीघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेपण पहा - पोटचा गोळा क्षणात गेला अन्‌ सुरू झाला मन हेलावणारा आक्रोश


शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, येथील ४० बंगला भागातील रहिवासी विनोदकुमार हनुमानशरन समाधिया (वय ५५) यांच्या मुलीच्या मोबाईलवर आरोपी सिमांक कुमार (पूर्ण नाव माहित नाही) (रा. बालाजी मेडिकल, घर नं. ८३ वार्ड क्र.८ अटारी लौकाहा मधुबने बिहार), राजकुमार कैलास व राजेशकुमार (दोघांची पूर्ण नाव माहित नाही) यांनी विनोदकुमार यांनी संगनमताने ओएलएक्स ऍप्लीकेशन वरुन स्कुटी घेण्यासाठी समाधिया यांच्या मुलीच्या मोबाईलवरुन गुगल पे द्वारे २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याबाबत विनोदकुमार  समाधिया यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाइक बंटी सैंदाणे तपास करित आहे.

ऑनलाईन फसवणूक सुरूच 
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूकीच्या घटना वाढतच असून, शहरात याअगोदरही सदानंद पुंडलिक बऱ्हाटे यांना एटीएम कार्डचा क्रमांक विचारुन ४६ हजार ९९७ रुपयात गंडा घालण्यात आला होता. सागर राजेश बत्रा या तरुणाने पतंजली वेबसाईटरील क्रमांकावर संपर्क साधून संबंधितासाठी डेअरी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरशिपसाठी बोलणी केली होती. त्यानंतर संशयितांनी ३ लाख ३२ हजार रुपये ऑलाईन त्यांच्या पंजाब नॅशनल बॅँकेत भरायला सांगितले. त्याप्रमाणे सागर याने ही रक्कम भरली, मात्र त्याला कोणतीच एजन्सी मिळाली नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सागर बत्रा याने सायबर क्राईमला तक्रार दिली होती. ऑनलाइन फसवणूकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

loading image