भुसावळात दरोडेखोरांनी पोलिसांवर रोखली पिस्तूल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

भुसावळ : शहरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांनी पंढरीनाथ नगरात या आरोपींची पाठलाग केला. तेव्हा यातील एकाने पळ काढला. तर दुसरा आरोपी पळत असताना दोन ठिकाणी पडला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखली. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. 

येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी रात्री गस्त करीत असताना, शहर पोलिस ठाण्यातील फरार आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया (रा.वाल्मीक नगर) व नंदुरबार लोहमार्ग पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यातील फरार आरोपी राकेश वसंत चव्हाण (रा. अमळनेर) हे दोघे जण भुसावळ शहरात घरफोडी व चोरी करण्याच्या इराद्याने शहरात आले असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यामुळे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी आरोपीचा शोध घेऊ लागले. तेव्हा रात्री साडेतीन वाजेच्‍या सुमारास पंढरीनाथ नगर भागात दोन जण संशयीतपणे जाताना दिसले. थांबा म्हणताच ते पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी विनोद चावरीयाला ओळखले. त्याचा पाठलाग केला परंतु तो गल्लीबोळाचा फायदा घेऊन पळून गेला. तसेच दुसरा आरोपी राकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. अमळनेर) याचा पाठलाग केला असता. तो दोन ठिकाणी पडला. त्याने उठून त्याच्या जवळ असलेला गावठी पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळ ५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, १ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत गावठी काडतूस मिळाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यातील साहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलिस नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, नरेंद्र चौधरी, पोलिस कॉन्‍स्‍टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल चौधरी, बापुराव बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: marathi news bhusawal police gun