भुसावळला शिवजयंतीनिमित्त माणुसकीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सकाळी नऊ वाजता पासून रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करण्यात आले.

भुसावळ : भुसावळ शहरामध्ये आज अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. सुलक्ष्मी सेवाभावी संस्था मार्फत बस स्थानक परिसरातील निराधार व्यक्तींना अंघोळ घालून नववस्त्र परिधान करण्यात आले.

औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप तर्फे आज भुसावळ शहरात एक आगळावेगळा उपक्रम व एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. गरीब निराधार बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजून जिवंत आहे हे समाजसेवक सुमित पंडित यांनी आज दाखवुन दिले. आज शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे सकाळी नऊ वाजता पासून रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करण्यात आले. यावेळी दत्तु खोडे, डि एस चौधरी, पंडित सनके, संजय बोरसे, गजानन क्षीरसागर, कमलाकर माळी, चेतन पाटील उपस्थित होते.
 

क्‍लिक कराः  औरंगाबाद मार्गावरील एक "लेन' एप्रिलपर्यंत पूर्ण होणार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal shivjayanti help of poor