"तणाव' कोंडी फोडण्यासाठी भाजप नगरसेवक सरसावले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नाशिक : प्रशासनाला जाब विचारण्यासाठी घटनेने महासभे सारखे मोठे व्यासपिठ निर्माण करून दिले असताना त्याचा वापर न करता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीमुळे निर्माण झालेली तणावकोंडी फोडण्यासाठी भाजपच्या युवा नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेवून आधाराचा शब्द दिला.

नाशिक : प्रशासनाला जाब विचारण्यासाठी घटनेने महासभे सारखे मोठे व्यासपिठ निर्माण करून दिले असताना त्याचा वापर न करता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीमुळे निर्माण झालेली तणावकोंडी फोडण्यासाठी भाजपच्या युवा नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेवून आधाराचा शब्द दिला.

 महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले. त्या फेरबदलातून पालिकेच्या कामकाजात कमालीची सुधारणा दिसून आली. परंतू अधिकारी, कर्मचायांवर कामाचा ताण निर्माण झाला. त्यातूनचं नगररचना विभागाचे सहायक अभियंता रवी पाटील बेपत्ता प्रकरण घडले. मुंढे यांची कामकाज हुकूमशाही पध्दतीचे असून कर्मचाऱ्यांची बाजू ऐकुन घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप कर्मचारी वर्गातून होत आहे.

 पालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावाखाली असल्याने त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी संघटना देखील पुढे येत नसल्याने तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार सहन करावा लागतं आहे. कर्मचाऱ्यांची तणावाखाली काम करण्याची मानसिकता लक्षात घेवून भाजपच्या युवा नगरसेवकांनी तणावकोंडी फोडण्यासाठी आज पासून अधिकारी व कर्मचायांच्या कामाच्या ठिकाणी भेटी घेवून समुपदेशन करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यात कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेताना आधाराचा शब्द दिला जात आहे. नगररचना, बांधकाम, पाणी पुरवठा विभागात आज नगरसेवक जगदीश पाटील, मुकेश शहाणे, ऍड. श्‍याम बडोदे, राकेश दोंदे, प्रतिभा पवार आदींनी आधाराचा शब्द दिला. अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक देखील केले. 

तर वेगळी संघटना 
कर्मचारी-अधिकाऱ्यांची बाजू घेण्यासाठी अधिकृत संघटना पुढे येत नसेल तर नवीन संघटना स्थापन करण्याची भुमिका नगरसेवक शहाणे यांनी मांडल्याने तणाव कोंडीच्या माध्यमातून शिवसेना प्रणित म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील संघटना फक्त आकडे गोळा करणे व कॅबिन मिळविण्यापुरती असल्याचा आरोप शहाणे यांनी केला. पुढील आठवड्यात पालिकेच्या कामकाजाबाबत नगरसेवकांमार्फत थेट मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले
 

Web Title: Marathi news bjp coroprter aggressive