भाजपचे बंडखोर उमेदवार कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने हकालपट्टी केली आहे. एरव्ही पक्षांकडून शिस्त म्हणून निलंबित करण्याची प्रथा आहे. पण कोकाटे यांच्या बाबतीत "हकालपट्टी' असा शब्द वापरण्यात आला आहे. 

   सिन्नर विधानसभा मतदार संघाचे तिनदा प्रतिनिधित्व केलेल्या ऍड. कोकाटे यांनी सन 2014 निवडणुकीत भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यापुर्वी कॉंग्रेस, शिवसेना नंतर भाजप असा पक्षानुरुप राजकीय प्रवास करणाऱ्या कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याचा शब्द दिल्याने गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली होती. परंतू लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापुर्वी भाजप व शिवसेनेचे सुत जुळल्याने कोकाटे यांना माघार घेण्याची वेळ आली होती परंतू आता थांबलो तर राजकारणातून निवृत्त व्हावे लागेल असा कयास बांधतं कोकाटे यांनी नाशिकची जागा भाजपला सोडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती परंतू उत्तर महाराष्ट्रात एकमेव नाशिक मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला असल्याने खासदार संजय राऊत यांनी भाजपची मागणी धुडकावून लावली
 
Web Title: marathi news bjp manikrao kokate decision