वाहतूक पोलीस शाखेला मिळाले 125 बॉडी वॉर्न कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिकः वाहतूक पोलीसांना शहरातील वाहतुकीची समस्या सोडविताना अनेकांची वादावादीला सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी वाद विकोपाला जाऊन वाहतूक पोलिसांना मारही खावा लागतो. अशा प्रसंगांना आळा बसावा, यासाठी आमदार हेमंत टकले यांच्या आमदार निधीतून शहर वाहतूक पोलीस शाखेसाठी 125 बॉडी वॉर्न कॅमेरे उपलब्ध झाल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. प्रातिनिधीक स्वरुपात वाहतूक पोलीसांना बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचे वाटप आज (ता.2) करण्यात आले. 
... 

पोलीस आयुक्‍तालयामध्ये पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्या हस्ते वाहतूक पोलीसांना बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्‍त डॉ. सिंगल म्हणाले की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. तसेच कारवाईमध्ये पारदर्शकता यावी यासाठी वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले.

ज्यामुळे कटूप्रसंग टाळता येतील. तसेच घटनेची सत्यताही स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आमदार हेमंत टकले यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी आमदार निधीतून कॅमेरे उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार, ई-टेंडरिंग प्रक्रिया करून 125 बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली असून पूर्वीच 5 व आत्ताचे 125 असे 130 कॅमेरे वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाले आहेत. 
 
असे आहेत बॉडी वॉर्न कॅमेरे 
या कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग क्वालिटी ही 3 मेगा पिक्‍सल असून 2900 एमएएच बॅटरी आहे. त्यामुळे सलग 8 तास रेकॉर्डिंग करता येणे शक्‍य आहे. कॅमेऱ्यांची स्टोरेज क्षमता 32 जीबी इतकी असून 21 मेगा पिक्‍सल क्वालिटीपर्यंतचा फोटो काढण्याची क्षमता आहे. कॅमेरे हे आयपी 67 वॉटरप्रुफ व डस्टप्रुफ क्वालिटीचे आहेत. 
 
Web Title: MARATHI NEWS BODY WARN CAMERA