
गोंधळाचा कार्यक्रम आटोपुन आपल्या घरी रायखेड येथे येत असताना ट्रॉली ला धडक दिल्याने आई व मुलगा असे दोन जण जागीत ठार तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील शहादा-खेतीया रस्त्यावरील सुलतानपुर फाट्यानजीक रस्त्याचा कडेला उभे असलेल्या कापसाच्या ट्रॉली ला अल्टो कार क्र. MH.14.GG.7523 ने मागून धडक दिल्याने आई व मुलगा असे दोन जण जागीत ठार तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
आवश्य वाचा- घोड्यांच्या टापांचा आवाज येईल अन नाचतील; महोत्सव आयोजनाची अपेक्षा
शहादा तालुक्यातील रायखेड येथील कुटुंब शहादा येथून गोंधळाचा कार्यक्रम आटोपुन आपल्या घरी रायखेड येथे येत असताना सुलतानपुर फाट्यापासून 50 मीटर च्या अंतरावर कापसाने भरून ट्रॉली क्र. MH.39.5206 ही पंचर होऊन रस्त्याचा कडेला उभी होती. यावर अचानक कार ने उभ्या ट्रॉली ला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात विद्या हर्षल हरदास (२७) आरोह हर्षल हरदास (वय ३) हे जागीच ठार झाले तर कार मधील सुरेश खंडू शिंदे (वय६०),सरोजबाई शिंदे(वय ५४),हर्षल सुरेश शिंदे (३२),मयूर शिंदे (वय ३४) , यज्ञेश प्रथमेश हरदास ( वय ७) सर्व राहणार रायखेड हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ नागरिकांनी शहादा येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
ट्रॉलीवर रिफलेक्टर नसल्याने अपघात
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉली हीला कुठलेही रिफलेक्टर व कसलीही खून केली नसल्याने हा अपघात झाल्याचे फिरीयाद संबंधित कुटुंबाने केली आहे घटनास्थळी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस काँ. नामदेव बिरारे बिरारे, जितू पाडवी आदी कर्मचाऱ्यांनी येऊन रस्त्यावरील वाहन सुरळीत केली.
संपादन- भूषण श्रीखंडे