परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीवर काळाची झडप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) : दुई (ता. मुक्ताईनगर) येथील बारावीतील विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी येत असताना, रस्त्यातच मोटरसायकलवरून पडल्याने कंटेनरखाली येऊन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास राशीबरडा जवळ घडली.

दुई (ता. मुक्ताईनगर) येथील विद्यार्थ्यांनी मंदाकिनी अशोक पाटील (वय १७) हीचा आज बारावी गणिताचा पेपर होता. मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आज सकाळी तिचे आजोबा भगवान गंभीर पाटील यांच्यासोबत मुक्ताईनगरला जाण्यासाठी मोटरसायकलवर निघाली. परंतु रस्त्यातच राशीबरडा जवळ मोटरसायकलवरून तोल गेल्याने ती खाली पडली. तेवढ्यात मागून येणारे कंटेनर तिच्या दोन्ही पायावरून गेल्याने तिला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला तत्काळ जळगाव हलविण्याचे सांगितले. जळगाव येथे जाताना रस्त्यातच मंदाकिनीचा मृत्यू झाला. कंटेनर चालक मात्र घटना घडताच पसार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news busawal accident hsc exam student death