औरंगाबाद जालनातील ३३० मतदार इगतपुरीत,शाही थाट अन् करडी नजर

पोपट गवांदे
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

इगतपुरी शहर - औरंगाबाद-जालना येथे 19 ऑगस्टला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील सुमारे ३३० मतदारांची इगतपुरी येथील पंचतारांकीत हॉटेल विक्रांत व हॉटेल बोध व्हॅली ( रेन फॉरेस्ट ) येथे शाही व्यवस्था केल्याने मतदारांना राजकीय नजर कैदेत सुध्दा शाही थाट मिळत आहे.
    मतदानाच्या आकडयासाठी आघाडीची जादुई जुळवा जुळव करीत असतांना मतदारांना एकत्रित न ठेवता वेगवेगळ्या दोन हॉटेलात व्यावस्था केली. या ठिकाणी कोणालाही जाणास परवानगी नसल्याने या राजकीय थाटाचे इगतपुरीत चर्चा सुरु झाली आहे .पंचतारांकीत हॉटेलात राजेशाही थाटात मौज करीत असल्याचे समजते.

महायुती व महाआघाडीचे हे मतदार असुन इगतपुरीत अज्ञातस्थळी यांना ठेवण्यात आले आहे यात एक अपक्ष उमेदवाराचा हि यात समावेश आहे.
३३० मतदार ऎच्छीक आनंद लुटण्याकरीता आले असतांना अनेक जण मनाला वाटेल ती मौज करण्यात दंग आहेत.पण त्यांच्या देखरेखीवर काही अज्ञात राजकीय पहारेकरी ठेवण्यात आले 

भेटण्यास मनाई
अज्ञातस्थळी म्हणुन ठेवण्यात आलेल्या मतदारांना कोणालाही भेटता येवु नये याकरीता स्थानीक पोलीस व राजकीय नेते तसेच हॉटेल परिसरातील व्याक्ती यांना या भागात बंदी केल्याने आत होणाऱ्या बैठका व चर्चा समजने कठीण झाले होते.
                   
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news candidate agbd and jalna