सीईटी'च्या ऑनलाईन अर्जाची रविवारपर्यंत अखेरची मुदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक : राज्य सामुहिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल) च्या माध्यमातून 10 मेस विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी "एमएचटी-सीईटी 2018' घेतली जाणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत रविवार (ता.25) पर्यंत असून विलंब शुल्कासह 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमांना या सीईटीद्वारे प्रवेश निश्‍चित करता येणार आहेत. दरम्यान सीईटी परीक्षेच्या तयारीची लगबग विद्यार्थ्यांमध्ये आतापासून सुरू झाली आहे. 

इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकीसह बी. फार्म, बी. एस्सी (होनर्स), बी. टेक, बी. एस्सी (कृषी) आदी अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी मार्फत केले जात होते. यंदाच्या वर्षापासून प्रथमच बी. एस्सी (कृषी) सह कृषी विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रमांनाही सीईटीच्या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 18 जानेवारीपासून सुरू झाली होती. नियोजित वेळापत्रकानुसार रविवार (ता.25) पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करतांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करत अर्जाचे कन्फरमेशन करता येणार आहेत. तर पाचशे रूपये विलंब शुल्कासह 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करून कन्फरमेशन करता येईल. अर्जसाठी विहीत परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन स्वरूपात भरण्याची सुविधा आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रूपये तर राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी सहाशे रूपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. 

"जेईई मेन्स'चे 8 एप्रिलला,"नीट' 6 मेस 
आयआयटी, एनआयटी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या जेईई मेन्स परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. या परीक्षेचा ऑफलाईन लेखी पेपर 8 एप्रिलला देशभरातील केंद्रांवर होणार आहे. तर ऑनलाईन स्वरूपातील परीक्षा 15 व 16 एप्रिलला पार पडेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे आयोजित या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जेईई ऍडवास्ड परीक्षा 20 मेस होणार आहे. तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या नीट 2018 करीता अर्जाची मुदत संपली आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 मेस परीक्षा घेतली जाणार आहे. 
 
Web Title: marathi news cet problim