बारा लघु प्रकल्पांमध्ये ठणठणात 

live photo
live photo

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या दोन वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी वाघले १ व २ वगळता उर्वरित १२ लघु प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ठणठणात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज आहे. सध्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह गुरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

चाळीसगाव तालुक्यात काही गावांमध्ये मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गिरणाकाठ सोडला तर इतर ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यावर्षी पिकांची परिस्थिती देखील अवघड आहे. वाघले १ व २ मध्ये किरकोळ पाणीसाठा शिल्लक असून हे दोन लघू प्रकल्प सोडले, तर बारा प्रकल्पामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. 

प्रकल्पांना गळती 
मेहुणबारे जवळच्या खडकीसिम बंधाऱ्याच्या सांडव्याची यापूर्वी दुरुस्ती केली. मात्र, पाहिजे तसे काम न झाल्याने या प्रकल्पातून पाण्याची गळती सुरूच आहे. वरखेडे गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या कृष्णापुरी धरणाचे देखील तेच रडग्रहाणे आहे. हा प्रकल्प भरल्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. शिवाय या प्रकल्पातून पाण्याची चोरीची देखील समस्या कायम आहे. या धरणात थोडाफार पाणीसाठा आहे. येथील पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश येत असून, पाणी चोरीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे. बोरखेडा येथील तलावाला दोन दरवाजे असून त्याचे पत्रे सडलेले आहेत. त्यामुळे येथूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते. शिवाय पाण्याची चोरी देखील होत. याबाबत लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार करूनही काही एक उपयोग होत नसल्याचा अनुभव अनेकदा ग्रामस्थांना आला आहे. या प्रकल्पांची दुरुस्ती झालेली असती तर प्रकल्प कोरडे झाले नसते. त्यामुळे या सर्व प्रकल्पाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. 

पशुधन विक्रीला 
उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरींना पाणी नाही, बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये ओलिताचे क्षेत्र कमी झाले आहे. गुरांसाठी चारा व पाणी समस्या निर्माण झाली आहे. एकेकाळी साठ रुपये शेकडा याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नव्हते. आज हाच कडब्याचा चारा त्यापेक्षाही अधिक दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटवले आहे. त्यामुळे चारा टंचाईचा फटका सहन करावा लागत असून, गुरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेकांनी आपली गुरे विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गुरांच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवली आहे. गावागावांतील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या गुरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 


कोरडेठाक पडलेले लघु प्रकल्प 
चाळीसगाव तालुक्यात लघु पाटबंधारे विभागाचे हातगाव १, पिंप्री उबंरहोळ, ब्राम्हण शेवगे, पिंपरखेड, कुझंर २, बोरखेडा, वलटांण, राजदेहरे, देवळी - भोरस, पथराड, कृष्णापुरी, खडकीसिम हे बारा प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मे महिना अर्धा बाकी असून, पुढे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. संभाव्य पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com