मेहूणबारे गावातील रस्तेच केले सिल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

मेहूणबारे  (ता.चाळीसगाव)येथे पती-पत्नी व मुलगी असे तीन जणांना ताब्यात घेतले. मेहूणबारे येथे तीन जण कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याची घटना कळताच गावात एकच खळबळ उडाली असून सुरक्षीत म्हणून ज्या भागात संशयित  सापडले तेेथील गल्ली बंद करण्यात आली आहे​

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :  शिरूड (ता.धुळे)येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात मेहुणबारे (ता.चाळीसगाव)एकाच कुटंबातील तिघांमुळे आता मेहुणबारे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.या ठिकाणी आता  खबरदारी म्हणून गावात येणारे सर्व रस्ते तरुणांनी  बंद करून टाकले आहेत.

हेही पहा - शिरुडच्या "कोरोना' रुग्णाच्या संपर्कातील बारा जणांना जळगावला रवानगी 

मेहूणबारे  (ता.चाळीसगाव)येथे पती-पत्नी व मुलगी असे तीन जणांना ताब्यात घेतले. मेहूणबारे येथे तीन जण कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याची घटना कळताच गावात एकच खळबळ उडाली असून सुरक्षीत म्हणून ज्या भागात संशयित  सापडले तेेथील गल्ली बंद करण्यात आली आहे तर मेहूणबारे गावात येणारे सर्व रस्ते नागरीकांनी व तरुणांनी  बंद करून टाकले आहेत.या सर्वांची चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी पी बाविस्कर यांनी तपासणी केली.यांना तातडीने जळगाव येथे नेण्यात आले आहे.
शिरूड (ता.जि.धुळे) येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या मेहूणबार येथील एकाच कुटुंबातील तीनजण  संपर्क चाळीसगाव येथे नऊ जण आल्याच्या घटनेने, मेहूणबारेसह संपूर्ण तालु्नयात एकच खळबळ उडाली आहे.चाळीसगाव पासून अवघ्या 55 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव व धुळे येथे कोरोनाने कहर केलेला आहे. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण असतांनाच आज कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आल्याने नागरीकांमध्ये भितने गाळण उडाली आहे.

मेहूणबाऱ्यात गावात येणारे रस्ते केले बंद
शिरूड येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात मेहूणबारे येथील तीन जण आल्याची माहिती आज सकाळी बाहेर येताच गावात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तिघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर  घाबरून न जाता घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. तर मेहूणबारे गावात येणारे सर्व रस्ते नागरीकांनी एकत्र येत लाकडे व काटे टाकून बंद केले.मेहूणबारे येथे आजच्या घटनेने नागरीकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. बाहेरच्या नागरीकांना गावात येण्यास मज्जाव केला जात आहे.

महिला चाळीसगावी आलीच कशी
कोेरोना विषाणुचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढत आहे. मालेगावच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात इतर जिल्ह्यातील काही लोक येत असल्याने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील सीमा सील करण्यात आल्या आहेत.या जिल्ह्यातील बॉर्डरवर पोलीसांची विशेष पथके तैनात करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दीबाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सुलतान खान हा तरुण देखील तीन दिवसापूर्वी मालेगाव सायने येथून चाळीसगावी आला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मालेगावची ही घटना ताजी असतांना शिरूड येथील ती महिला चाळीसगावात आलीच कशी असा सवाल केला जात आहे.ज्या भागातून त्यांना ताब्यात घेतले तेथील भाग निर्जतुंक करण्यात आला आहे.नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon corona virus mehunbare village road lock