शिरुडच्या "कोरोना' रुग्णाच्या संपर्कातील बारा जणांना जळगावला रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील पती-पत्नी व मुलगी तर चाळीसगाव येथे चार महिला, दोन मुले, तीन पुरुषांना अशा अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः शिरुड (जि धुळे) येथे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून,मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील तीन जण चाळीसगाव शहरातील नऊ असे बारा जणांना आज पोलिसांनी खबरदारीसाठी ताब्यात घेतले, त्यांना पुढील तपासणीसाठी तातडीने जळगाव येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी दिली असुन यामुळे मेहुणबारेसह तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. 

क्‍लिक कराः आमचे हात बांधलेत, काय करणार - असे कोण म्हणाले.. वाचा सविस्तर.. 
 

धुळे जिल्ह्यातील शिरूड येथे एक करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने,त्यांच्या शेजारी राहणारा व्यक्तीची सासरवाडी चाळीसगाव येथील आहे, त्या दोघांची मैत्री असल्याने हे दोघे एकाच गाडीत ये-जा करीत होते. दरम्यान चाळीसगाव येथे माहेर असलेल्या मित्राची पत्नी गरोदर असल्याने ती नुकतीच चाळीसगाव येथे आली. 

याची माहिती चाळीसगाव तहसीलदारांना, धुळे येथील तहसीलदारांनी दिली. त्यामुळे चाळीसगाव येथे माहेर असलेल्या त्याच्या पत्नीच्या संपर्कातील परिवारातील चाळीसगाव येथील सदस्य तसेच मेहुणबारे येथील सदस्यांना पोलिसांनी कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून खबरदारीसाठी ताब्यात घेतले. 

आर्वजून पहा : "लॉकडाउन'मध्ये किचन "ऍक्‍टिव्ह मोड'वर... चटपटीत पदार्थांसह "हेल्दी फूड'ला प्राधान्य
 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील पती-पत्नी व मुलगी तर चाळीसगाव येथे चार महिला, दोन मुले, तीन पुरुषांना अशा अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बाविस्कर यांनी तपासणी केली असून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे तात्काळ रवाना करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाचे नियमाचे पालन करावे असे आव्हान मेहुणबारे पोलिसांनी केले आहे. 
 

नक्की वाचा : यंदाच्या "आखाजी'वर "लॉकडाउन'चे सावट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare Twelve people in contact with Shirud's "Corona" patient were sent to Jalgaon