esakal | दुकान उघडले म्हणून चाळीसगावला दोघांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

corona police case

सिग्नल चौक ते घाटरोड, भडगाव रोड, हिरापूर रोड भागात गर्दी होती. संचारबंदीचा निर्णय हा आपल्यासाठीच घेण्यात आला आहे ही भावना नागरिकांमध्ये नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना घरीच राहण्याची विनंती केली. तरी देखील कोणी ऐकण्यास तयार नव्हते.

दुकान उघडले म्हणून चाळीसगावला दोघांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. आंतरजिल्हा प्रवेश देखील बंद करण्यात आले आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे चित्र चाळीसगावात दिसून आले. संचारबंदी लागू असताना देखील दुकान उघडण्या आले होते. दुकान उघडणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेपण वाचा -तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत...

संचारबंदी लागू करण्यात आली असताना चाळीसगावात मात्र सर्वत्र मुक्तसंचार दिसून आला. नागरिक नेहमी प्रमाणे मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसून आले. यामुळे सिग्नल चौक ते घाटरोड, भडगाव रोड, हिरापूर रोड भागात गर्दी होती. संचारबंदीचा निर्णय हा आपल्यासाठीच घेण्यात आला आहे ही भावना नागरिकांमध्ये नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना घरीच राहण्याची विनंती केली. तरी देखील कोणी ऐकण्यास तयार नव्हते. दरम्यान संचारबंदी असतांना देखील दुकाने उघडले असल्याने दोन व्यापाऱ्यांना ते चांगलेच महागात पडले. त्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

बजाज शोरूम वाल्याचे दालन खुले 
कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरांग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये 13 मार्च ते 31 मार्चपर्यंत जळगाव जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू नये व अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना कार्यरत ठेवू नये; असा आदेश जारी केला असतांना आज (ता.24) पो.ना. पंढरीनाथ पवार, हे.कॉ. गणेश पाटील, पो.ना. संदीप पाटील, नितीन पाटील हे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव रोड परीसरात दुपारी साडेबाराच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. यावेळी हर्षद श्रीकृष्ण ढाके हे बजाज शोरूम मोटारसायकल विक्री करण्याचे उद्देशाने उघडे करत दुकानातील साहित्य विक्री करीत असतांना मिळून आले. तर दुसरी कारवाई दुपारी पऊण वाजेच्या सुमारास हेमचंद्र जगन्नाथ चौधरी हे चंद्रकिरण ट्रेडर्स नावाचे अंबुजा सिमेंटचे दुकान सिमेंट विक्रीचे दुकान उघडे केले होते. या दोघांविरोधातही भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.