चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

चाळीसगाव : नागरिकांना जलद गतीने न्याय मिळण्यासाठी चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय व्हावे या मागणीला यश आले आहे. चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय आला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. 

दिवाणी न्यायालय खटल्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना जळगाव येथे फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे नागरिकांना अधिक पैशांसह वेळही खर्च करावा लागत होता. दिवाणी स्वरूपाचे सर्व खटल्यांवर जलद गतीने न्याय मिळण्यासाठी चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करावे अशी जवळपास 1987 पासून मागणी होती. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या पाठपुराव्यासाठी चाळीसगाव वकील संघ व आमदार उन्मेष पाटील यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय साठी मंत्रिमंडळात नुकतीच मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दिवाणी स्वरूपाचे सर्व खटले चाळीसगाव येथे चालवण्यात येऊन नागरिकांना जलद न्याय मिळण्यासाठी मदत होणार आहे. मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे चाळीसगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे

Web Title: marathi news chalisgaon divani nyayalay