हटभट्टीवर कारवाई केली; पण ती पुन्हा सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पोलीसांना घटनास्थळी तब्बल 200 लिटरच्या 10 प्लॉस्टीकच्या टाक्यांमध्ये 2 हजार कच्चे पक्के रसायन तर 50 लिटर मापाच्या 10 प्लॉस्टीक कॅनमध्ये गुळ नवसागर मिश्रीत 500 लिटर रसायन मिळून आले.मात्र पोलीसांचे पथक येत असल्याचे दिसताच हातभट्टीचालक पळून गेला.याप्रकरणी फरार हातभट्टीचालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : लॉकडाऊन काळातही तालुक्यात गावठी हातभट्टी दारूचा महापुर सुरुच  आहे.चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करीत  सायगाव (ता.चाळीसगाव) येथे मन्याड काठावर झुडूपाच्या आडोश्याला असलेल्या हातभट्टीवर दुपारी 12 वाजता छापा टाकून सुमारे 81 हजार रूपये किंमतीचे दारू रसायन जप्त केले. पोलीसांना घटनास्थळी तब्बल 200 लिटरच्या 10 प्लॉस्टीकच्या टाक्यांमध्ये 2 हजार कच्चे पक्के रसायन तर 50 लिटर मापाच्या 10 प्लॉस्टीक कॅनमध्ये गुळ नवसागर मिश्रीत 500 लिटर रसायन मिळून आले.मात्र पोलीसांचे पथक येत असल्याचे दिसताच हातभट्टीचालक पळून गेला.याप्रकरणी फरार हातभट्टीचालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांना गुप्त माहीती मिळाली की, सायगाव शिवारात मन्याड नदीकाठी झाडा झुडपात ताराचंद कारभारी सोनवणे हा गैरकायदा विना परवाना हातभट्टीची दारू तयार करीत आहे. त्यांच्या आदेशानुसार एसआय संजय काळे, प्रशांत पाटील, नंदकिशोर निकम, मुकेश देशमुख, संजु मोरे यांच्या पथकाने आज (ता.23) रोजी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास सायगाव शिवारात छापा टाकला. मात्र पोलीस येत असल्याचे दिसून येताच ताराचंद सोनवणे हा पळून गेला. पथकाने घटनास्थळावरून 60 हजार रूपये किंमतीची प्रत्येकी 200 लिटर मापाच्या 10 प्लास्टीकच्या टाक्यात गुळ, नवसागर मिश्रीत 2 हजार लिटर कच्चे पक्के रसायन, 15हजार रूपये किंमतीचे 50 लिटर मापाच्या 10 प्लास्टीकचे ड्रम त्यात गुळ, नवसागर मिश्रीत 500 लिटर कच्चे पक्के रसायन, 4 हजार रूपये किंमतीचे 10 प्लास्टीकच्या टाक्या व भट्टी पेटविण्याची उपयुक्त साधने आणि 2 हजार रूपये किंमतीचे प्लास्टीकचे ड्रम असा सुमारे 81 हजार रूपये किंमतीचा ऐवज पकडला. पथकाने कच्चे पक्के रसायन व हातभट्टी जागीच नष्ट केली.
 
याप्रकरणी पोलीस हवलदार प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हातभट्टीचालक ताराचंद सोनवणे याच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून अवमान केल्याने व भारतीय साथरोग अधिनियम 1997चे कलम आपत्ती व्यवस्थापन नुसार मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या सत्राने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या पथकाने यापूर्वीही लॉकडाऊन काळात हातभट्ट्यांवर कारवाया केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon hatbhatti police action today