किन्नर भिडले एकमेकांसोबत...एकास जबर मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

चाळीसगाव : शहरातील एका किन्नरला तीन गुंडांनी मारहाण केल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील स्टेशन रोड भागात घडली. या घटनेत जखमी झालेल्या किन्नरने आपल्या जीवाला तिघा गुंडांसह काही किन्नरपासून धोका असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आहे.

नक्‍की पहा -जन्मदात्याच्या शाळेला मुलाची अनोखी भेट

रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झोया किन्नर (वय ३०) ही आपल्या गुरुसोबत असताना अल्लारखा शाह, आमजद शाह बसू बरकत शाह या तिघांनी मागाहून येऊन अचानक जीवघेणा हल्ला केला. जोया किन्नरच्या डोक्यात काहीतरी जोरात मार बसल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी झोयाला शहरातील बापजी रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसात त्यांनी तक्रार दिली आहे. 

अनेक दिवसांपासून पाठलाग 
गेल्या दहा वर्षापासून जोया किन्नर ही आपल्या गुरू कविता किन्नर यांच्यासोबत राहत आहे. त्यांना या भागातील काही गुंडापासून जीवाला धोका निर्माण झाला आहे, हे गुंड आपल्याकडे सतत पैशाची मागणी करीत असतात, पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देतात. त्यामुळे आपल्याला गुंडांपासून वाचवावे व तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

किन्नरांमध्ये गटबाजी 
चाळीसगाव शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात बरेच किन्नर वास्तव्यास आहेत. किन्नर यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याने त्यांच्यात गटबाजी निर्माण झाले आहे त्यामुळे अमुक ठिकाणीच पैसे मागितले पाहिजे अमुक ठिकाणी जायला नको या कारणावरून त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहेत या वादातूनच ही मारहाण झाल्याचे दिसत आहे
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Shemale heating road night