तीन फूट उंचीचे वधू-वर! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. अशीच काहीशी गाठ केवळ तीन फूट उंची असलेल्या धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील नीलेशची बांधली गेली आणि त्याला त्याच्याच उंचीएवढी तीन फुटांची मुलगी मिळाली. या दोघांचा विवाह आज थाटामाटात पार पडला. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. अशीच काहीशी गाठ केवळ तीन फूट उंची असलेल्या धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील नीलेशची बांधली गेली आणि त्याला त्याच्याच उंचीएवढी तीन फुटांची मुलगी मिळाली. या दोघांचा विवाह आज थाटामाटात पार पडला. 
धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील लुभान बळवंत जगताप यांचे ज्येष्ठ पुत्र नीलेश हा जन्मतः उंचीने लहान आहे. त्याचे वय वाढले, तरी उंची मात्र तीनच फूट आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची चिंता आई- वडिलांना लागली होती. आपल्या मुलासोबत त्याच्यापेक्षा उंच असलेली मुलगी लग्न करणार नाही, याची जाणीव असल्याने त्यांनी त्याच्या उंचीच्या मुलीचा शोध सुरू केला. अशातच नांदगाव तालुक्‍यातील जामदरी गावात तीन फूट उंची असलेली मुलगी असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

असा घडवून आणला विवाह 
नीलेशच्या वडिलांचे रणखेडे येथील मावसभाऊ संतोष देसले यांना या मुलीची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी जामदरी (ता. नांदगाव) येथील संजय धोंडू शेवाळे यांची ज्येष्ठ कन्या योगिता हिला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांनी हा विवाह घडवून आणण्याचे ठरविले. त्यानुसार, आवश्‍यक ती प्राथमिक बोलणी करून प्रत्यक्ष नीलेश व योगिता यांनी एकमेकांना पाहिले. त्यांची पसंती झाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त निश्‍चित केला. 

थाटात पार पडला विवाह 
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील साई संकेत लॉन्सवर आज सकाळी 11 वाजुन 45 मिनिटांनी हा विवाह थाटामाटात पार पडला. योगिताच्या कुटुंबात आई- वडील, चार बहिणी, भाऊ आहेत; तर नीलेशच्या कुटुंबात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी आहेत. विवास सोहळ्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. केवळ एकमेकांना अनुरूप जोडीदार मिळाल्याने हा आदर्श विवाह ठरला आहे. 

वधू-वर दोघेही शिक्षित! 
नीलेशचे शिक्षण बारावीपर्यंत धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील शाळेत झाले. त्यानंतर त्याने शांतिदेवी चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालयातून संगणकीय डिप्लोमा पूर्ण केला. सध्या त्याचे धामणगावात स्वतःचे दूध संकलन केंद्र आहे. स्वतः घरी थांबूनच तो उद्योग- व्यवसाय करतो. कोणावरही अवलंबून न राहता, नीलेशने स्वबळावर हे यश संपादन केले आहे. त्याची अर्धांगिणी झालेल्या योगिताचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. 

आम्हाला आमच्या मुलाचे लग्न थाटामाटातच करावे, असे आमच्या सर्व कुटंबीयांचे स्वप्न होते. आजच्या विवाहाने ते पूर्ण झाले. हा आमच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंद आहे. 
- लुभान जगताप, नवरदेवाचे वडील, धामणगाव (ता. चाळीसगाव) 

Web Title: marathi news chalisgoan 3 foot hight marrage