#BATTLE FOR DINDORI मैत्री सांभाळायची की  आमदारकी पक्की करायची?  चारोस्करांच्या व्यूहरचनेमागे काय? 

संदीप मोगल
मंगळवार, 9 एप्रिल 2019

लखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढतीत दोघा माजी आमदारांची मैत्री पणाला लागली. एकीकडे एक मित्र खासदारकी लढत असल्याचा आनंद साजरा करायचा की स्वतःच्या भविष्यासाठी व्यूहरचना आखायची, असा प्रश्‍न नक्कीच माजी आमदार रामदास चारोस्कर यांना पडला असावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कार यांची राजकीय मैत्री असताना सध्याची लोकसभा मात्र या मैत्रीची कसोटी पाहणारी आहे.

लखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लढतीत दोघा माजी आमदारांची मैत्री पणाला लागली. एकीकडे एक मित्र खासदारकी लढत असल्याचा आनंद साजरा करायचा की स्वतःच्या भविष्यासाठी व्यूहरचना आखायची, असा प्रश्‍न नक्कीच माजी आमदार रामदास चारोस्कर यांना पडला असावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कार यांची राजकीय मैत्री असताना सध्याची लोकसभा मात्र या मैत्रीची कसोटी पाहणारी आहे.

धनराज महाले व रामदास चारोस्कर निवडणुकीत एकत्र आल्याने मागील काळात धनराज महाले यांच्या रूपाने विधानसभेवर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवता आला. नंतरच्या काळात काहीसे दुरावलेली मैत्री पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या रूपाने पुन्हा एकदा सुरू झाली. या वेळी तालुक्‍यात शिवसेना व कॉंग्रेस यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणात एकहाती सत्ता काबीज करत एक अनोख्या युतीच्या रूपाने तालुक्‍यात सत्ता आली. मात्र जिल्हा परिषदेच्या बदललेल्या राजकारणात दिंडोरीमधील अनोखी युती सत्तेच्या सत्तापटलावर टिकली नाही. अर्थात त्यानंतर शिवसेनेने दिंडोरीमधील पंचायत समितीमधील सत्ताबदल झाल्याने या दोघांच्या मैत्रीत काहीसा दुरावा दिसला. 

"दुश्‍मन का दुश्‍मन दोस्त होता है' या राजकीय उक्तीप्रमाणे श्रीराम शेटे यांना धनराज महाले यांचा असलेला विरोध हेरत महाले यांना आमदारकी व जिल्हा परिषदेमध्ये मोठी मदत करत आपल्या मनातील राग व मैत्री चारोस्कर यांनी सांभाळली. अर्थात धनराज महाले यांनीही रामदास चारोस्कर यांना जिल्हा परिषदेच्या काही गटांमध्ये मदत करत मैत्री सांभाळली. मात्र आता धनराज महाले आपल्या जीवनातील सर्वांत मोठी निवडणूक लढत असताना ज्या मित्राच्या मदतीची अपेक्षा होती त्याच मित्राने आजच्या दिंडोरीच्या सभेत महालेंच्या प्रतिस्पर्धी भारती पवार यांना निवडून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याने या मैत्रीला तडा जातो की काय, अशी अवस्था झाली आहे. 

विधानसभेची पायाभरणी की मैत्री? 

महाले राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्याने माजी आमदार रामदास चारोस्कर यांना शिवसेना किंवा भाजपमध्ये मोठी संधी निर्माण झाली. अर्थात आता यासाठी चारोस्कर समर्थकांना युतीच्या भारती पवार यांना दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी देऊन आपली उमेदवारी भक्कम करावी लागणार आहे. यामुळे सध्या स्वतःसाठी की मित्रासाठी, असा प्रश्‍न विचारला तर स्वतःसाठी, असेच उत्तर मिळेल यात शंकाच नाही. 

भाजपत प्रवेश असता तर पुन्हा मैत्री राहिली असती अबाधित 
 
भाजपचा लोकसभेचा तीन वेळा निवडून आलेला उमेदवार बदलला जाईल, अशी कोणतीही शक्‍यता नसल्याने धनराज महाले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली व नंतर उमेदवार बदलला गेला. अर्थात याची काहीशी पुसटशी कल्पना असती तर महाले यांचा भाजपप्रवेश नक्की झाला असता व रामदास चारोस्कर यांना ही आपली मैत्री अबाधित राखण्याची संधी चालून आली असती. राज्याच्या राजकारणात आघाडी व युतीची पायाभरणी झाल्यानंतर युती म्हणजे धनराज महाले व आघाडी म्हणजे आमदार नरहरी झिरवाळ असे हुकमी एक्के बाहेर येतात. या वेळी माजी आमदार रामदास चारोस्कर नेमकी काय भूमिका घेतील याचा कायम संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये असे. आता धनराज महाले राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल झाल्याने रामदास चारोस्कर यांना अलगद विधानसभेसाठी चांगली जागा रिकामी झाली. 

Web Title: marathi news CHAROLSKAR