चतुरंग प्रतिष्ठानचा पुण्याच्या सय्यदभाई यांना जीवनगौरव पुरस्कार

residentional photo
residentional photo

नाशिक ः चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा सामाजिक क्षेत्रासाठी देण्यात आला असून, त्यासाठी सय्यदभाई (पुणे) यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या तीन तलाक प्रथेविरुद्ध चिकाटीने 40 वर्षे लढा देणाऱ्या कार्याची दखल घेतली आहे. चतुरंगतर्फे 21 व 22 डिसेंबरला नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित दोनदिवसीय रंगसंमेलन घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानने पत्रकाद्वारे दिली. 

सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक यापैकी कोणत्याही क्षेत्रात निरलस वृत्तीने झोकून देऊन कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा लोकपुरस्काराने जाहीर गौरव सन्मान व्हावा, या संकल्पनेतून 1991 मध्ये या पुरस्काराची निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांनी जीवनगौरव पुरस्कार असे त्याचे नामकरण त्या वेळी केले होते. तीन लाख रुपये (पूर्वी एक लाख रुपये), सोनेरी सूर्यप्रतीकांचे भव्य सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने आतापर्यंत 28 मान्यवर दिग्गजांना रंगसंमेलन सोहळ्यात गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार रसिक, नागरिकांनी एकदाच प्रत्येकी एक हजार रूपये याप्रमाणे दिलेल्या स्वेच्छा-निधीच्या व्याजातून दरवर्षी दिला जातो. त्यामुळे तो खराखुरा लोकपुरस्कार वा जनपुरस्कार ठरतो. सात मान्यवरांच्या निवड समितीद्वारे पुरस्कार्थींची निवड केली जाते. 

संमेलनावर साहित्य,नाट्य,नृत्य,संगीत,वादनाची छाप 
हा पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी होणारे चतुरंग रंगसंमेलन म्हणजे साहित्य,नृत्य,नाट्य,संगीत,वादन अशा विविध कला सादरीकरणाचा असा दोन दिवसांचा उत्सव असतो. दरवर्षी यात पाऊणशेहुन अधिक कलावंताचा सहभाग असतो. आतापर्यत मुंबईत दादर,धोबीतलाव,मुलूंड,गेट वे ऑफ इंडिया,बोरीवली येथे तर मुंबईबाहेर डोबिंवली,आनंदवन वरोरा,गोवा,चिपळून इत्यादी ठिकाणी झाले असून यंदा प्रथमच नाशिकमध्ये होईल. वर्षे 2019 ला निरोप आणि 2020 चे स्वागत करण्याच्या टप्प्यावर नाशिककर रसिक प्रेक्षक श्रोत्यांसाठी एक अनोख्या सांस्कृतिक संमेलनाचा एका दिमाखदार सोहळा होत असून ही चांगली बाब आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com