LOKSABAH2019 खा.चव्हाणांची बंडाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नाशिक, ः भारतीय जनता पक्षाने जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलल्याने खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण समर्थकांनी उमेदवारीसाठी दबाव आणखी वाढविला आहे. अपेक्षा उंचावलेल्या खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी बंडखोरीचा इशारा देताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेला. 

नाशिक, ः भारतीय जनता पक्षाने जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलल्याने खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण समर्थकांनी उमेदवारीसाठी दबाव आणखी वाढविला आहे. अपेक्षा उंचावलेल्या खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी बंडखोरीचा इशारा देताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेला. 

भाजपने जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलला. तेथील उषा वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी निश्‍चित केली असून, जळगावसोबतच नंदुरबार येथील उमेदवारी बदलासाठी भाजपचा एक गट सक्रिय झाला आहे. खानदेशातील भाजप अंतर्गतच्या या घडामोडींमुळे उमेदवारी नाकारल्याने यापूर्वीच 
समर्थकांचा मेळावा घेऊन बंडाचे निशान फडकविलेल्या नाराज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी आणखी उचल खात भाजपवर उमेदवारीसाठी दबाव वाढविला आहे. उ

मेदवारी कापल्याने कमालीचे नाराज असलेल्या खासदार चव्हाण यांनी मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन करून यापूर्वीच बंडाचा इशारा दिला आहे. आज पुन्हा जळगावप्रमाणेच नाशिकला उमेदवार बदलला जावा, यासाठी खासदार चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी दबाव वाढविला आहे. 

पती-पत्नीने नेले अर्ज 

खासदार चव्हाण यांचे पुत्र समीर यांनी आज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि मातोश्री कलावती चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेले. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी कलावती चव्हाण यांच्यासाठीही अर्ज नेल्याने चव्हाण पत्नीच्या उमेदवारीतून बंडाचा झेंडा रोवणार का? असाही प्रश्‍न आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या चव्हाण यांच्यावतीने त्यांच्या मुलाने उमेदवारी अर्ज नेत बंडाळीचे संकेत दिल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 28 इच्छुकांनी अर्ज नेले. त्यात ऍड टी. के. बागूल, भीमसेनेतर्फे रवींद्र कराटे, अशोक जाधव, बाबासाहेब बर्डे, रामदास बर्डे, गुरुदास लोखंडे, दशरथ गायकवाड, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, कलावती चव्हाण अशा नऊ जणांनी अर्ज नेले. काल पहिल्या दिवशी दिंडोरीतून 19 जणांनी अर्ज नेले होते. त्यात आज आणखी नऊ जणांनी अर्ज नेल्याने दिंडोरीतून अर्ज नेलेल्यांची संख्या 28 झाली. 

Web Title: marathi news CHAVAN