कंपनीची माहिती चोरून फसवणूक ,सात जणांविरूद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

नाशिक: कंपनीचा मेल आयडी वापरून माहिती चोरून त्यावरून दुसरी कंपनी स्थापण करून तेथील कर्मचाऱ्यांना ती कंपनी सोडून स्वत:च्या कंपनीत काम करण्यास प्रवृत्त करत मूळ कंपनीच्या ग्राहकांबरोबर करार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरूद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित तुषार शंकर कालेकर, मानसी राजेंद्र पाटील, राजेंद्र रामराव सोनवणे, शंकर दत्तात्रय कालेकर, चंद्रकला दत्तात्रय कालेकर, किरण दत्तात्रय कालेकर, एकनाथ सोमनाथ सुंभे यांनी मनिषा सचिन संगमनेरे यांच्या डिजिटल विंग्ज कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करत असताना संशयित मानसी राजेंद्र पाटील यांनी कंपनीचा मेलआयडी वरून कंपनी व ग्राहकांची सर्व माहिती चोरून त्यामध्ये इतर सहा जणांना सहभागी करून घेत पहिल्या कंपनीची माहिती जशीच्या तशीच ठेवत केवळ संस्कृती फाउंडेशन नावाची स्वत:ची दुसरी ट्रस्ट स्थापण केली. मनीषा संगमनेरे यांच्या संस्थेच्या ग्राहकांबरोबर वरील संशयितांनी करार करण्याचा प्रयत्न करून संगमनेरे यांच्या संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून संस्कृती फाऊंडेशन संस्थेत काम करण्यास प्रवृत्त केले. 
 
Web Title: Marathi news cheating fraud

टॅग्स