esakal | भाव वाढीच्या अपेक्षेने वीस टक्के कापूस घरात! 
sakal

बोलून बातमी शोधा

cotton center

‘सीसीआय'ची केंद्रे वेगवेगळ्या कारणांनी बंद तर कधी सुरू राहिली आहेत. केंद्र पूर्ण बंद होतील या कारणाने पारोळा व अन्य ठिकाणी कालपासून मोठ्या रांगा होत्या. तरीही जिल्ह्यात सीसीआयने १ ऑक्टोबरपासून सुमारे ५९ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे.

भाव वाढीच्या अपेक्षेने वीस टक्के कापूस घरात! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहूनही कापसाचा एकरी सरासरी उतारा कमीच राहिला. भाव वाढेल या आशेवर अजूनही उत्पादकांच्या घरात एकूण उत्पादनाच्या जवळपास वीस टक्के कापूस विक्रीअभावी पडला असून ‘सीसीआय'ने यावर्षी आतापर्यंत जवळपास ५९ लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. 

क्‍लिक करा - दूध खरेदी दरात वाढ


‘सीसीआय'ची केंद्रे वेगवेगळ्या कारणांनी बंद तर कधी सुरू राहिली आहेत. केंद्र पूर्ण बंद होतील या कारणाने पारोळा व अन्य ठिकाणी कालपासून मोठ्या रांगा होत्या. तरीही जिल्ह्यात सीसीआयने १ ऑक्टोबरपासून सुमारे ५९ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. गेल्या वर्षी हीच खरेदी अवघी साडेअकरा लाख गाठी इतकी होती. तर व्यापाऱ्यांकडून खेडाखरेदी मागील महिन्यापर्यंत जोरात होती ती फेब्रुवारीत मंदावली आहे. देशभरात यावर्षी अखेरपर्यंत ३६० ते ३६२ लाख गाठीचे उत्पादन होईल, असा अंदाज असून देशात महाराष्ट्र व तेलंगणामध्ये सीसीआयने उत्तम प्रतीची मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केली. सध्या चोपडा तालुक्यात कमी तर अमळनेर, पारोळा, चाळीसगाव भागात बराच कापूस विक्रीअभावी शिल्लक आहे. 

हेपण पहा - चाळीसगाव, पाचोरा, जामनेरला वादळी पाऊस

कापसाचे खरेदी दर असे 
‘सीसीआय'कडून उत्तम प्रतीचे लांब धाग्याचा कापूस ५ हजार ५०० रुपये. मध्यम धाग्याचा कापूस ५ हजार २५५ रुपये, तर खेडा खरेदीत व्यापाऱ्यांकडून सुरवातीला ५ हजार २५० रुपयांपर्यंत कापूस खरेदी झाली. मात्र, आता ४ हजार ९०० ते ४ हजार ९५० रुपये दराने खरेदी सुरू आहे. खरेदी मंदावली असून भावाढीची अपेक्षा असली तरी भावात अजूनही तेजी आली नसून कोरोनामुळे चीनचा व्यवहार थांबला आहे. 
 

loading image