पवारांचे सह्याद्रीवर प्रेम, तर हिमालयावर नजर : अरूणभाई गुजराथी 

arunbhai gujrathi
arunbhai gujrathi

चोपडा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चोपडा साखर कारखान्याचे उद्घाटन केले आहे. त्यांचे प्रेम आहे सह्याद्रीवर, तर नजर हिमालयावर आहे. अशी व्यापक दूरदृष्टी असल्याने निश्चितच ते तालुक्याकडे लक्ष घालतील, असे गौरवोद्गार माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी काढले. 
चोपडा तापी सहकारी सूतगिरणीच्या आज झालेल्या उद्‌घाटन समारोहात ते बोलत होते. यावेळी श्री. पवार यांची भेट घेण्यासाठी व सत्कारासाठी कार्यकर्त्यांची झुंबड होती. पक्षाचे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा व्यासपीठावर येऊन श्री. पवार यांचा सत्कार केला. 


श्री. गुजराथी म्हणाले, की सूतगिरणीत कैलास पाटील यांना यश आले आहे. मात्र, मला अपयश आले, तुम्ही मला वडीलकीचा मान दिला तर तुम्हालाही पाटीलकीचा मान आहे. शिवसेनेचा एक गट आहे. लोक मला प्रश्न विचारतात कैलास पाटील कुणाच्या वाटेवर? खर तर तो त्यांचा प्रश्न असून, यावर मी उत्तर कसे देणार. वस्रोद्योग अतिशय अडचणीत असून, मंदी आहे ती हटायला हवी. गेल्या ५० वर्षांत नव्हती इतकी बेरोजगारी सद्यःस्थितीत आहे. श्री. पवार रिमोट कंट्रोल नाहीत. खरे तर ते कुणावरही नियंत्रण ठेवत नाहीत. ते एक प्रेम देणारे व्यक्तिमत्त्व आहे, असेही ते म्हणाले. 

सूतगिरणीला सहकार्य करा : कैलास पाटील 
सूतगिरणी अध्यक्ष कैलास पाटील म्हणाले, की (स्व.) धोंडूअप्पा पाटील यांनी अतिशय कमी खर्चात चोसाका उभारला. जिल्ह्यातील कारखान्यांची (मुक्ताईनगर सोडून) वाईट अवस्था आहे. १९९१ मध्ये स्थापन झालेला सूतगिरणी प्रकल्प २७ वर्ष निधीअभावी रखडला. २००८ मध्ये आपण धुरा हाती घेतली. १२ हजार चात्यांवरून १७ हजार, २१ हजार आणि आता २५ हजार चात्यांवर सूतगिरणी सुरू होणार आहे. जिद्द मनात होती की २५ हजार चात्यांवर उद्घाटन करणार ते आज पूर्ण झाले. भविष्यात जिनिंग, प्रेसिंग, कॉटन पॉवरलूम प्रकल्प हाती घेणार आहोत. (स्व.) बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, की महाराष्ट्राच्या जनतेने मला सांभाळले तसे माझ्या उद्धवला सांभाळा.! श्री. पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांभाळले. (स्व.) बाळासाहेब व तुमची मैत्री कुणालाच कळली नाही. मैत्रीचे नाते कायम कसे असते ते तुम्ही दाखवून दिले. मागील सरकारने तीन रुपये सबसिडी दिली होती. आताही रिमोट कंट्रोल आपणच आहात तालुक्यातील एकमेव 
महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे लक्ष देऊन सहकार्य करावे, असे आवाहनतही श्री. पाटील यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com