जळगाव शहरातील भुरे मामलेदार भागात सिलेंडरचा स्फोट

live photo
live photo

शहरातील शिवाजीनगर भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. पार्टेशन एकमेकांना लागून असलेल्या चौदा पार्टेशनच्या खोल्या अवघ्या अर्ध्यातासातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीने रौद्ररुप धारण केल्याने घरातील स्वयंपाक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मात्र परीसर हादरला, शेजारील रहिवासी परिसरातील तरुणांनी मदतीसाठी धाव घेत, एकामागून एक गॅससिलेंडर बाहेर काढून वाचवले. शॉटसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्‍यता रहीवाश्‍यांनी व्यक्त केली आहे. 

जळगाव शहरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात सतिष प्रतापराव कंडारे यांच्या मालकीच्या जागेवर, प्लॉटनं. 11 मध्ये पार्टेशनच्या चाळीत 14 खाल्यांमध्ये 9 कुटूंबीय वास्तव्यास होते. मंगळवार(ता.12) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक एका घरातून धुराचे लोट निघु लागल्याने घरात असलेल्या महिलांनी बाहेर पडत मदतीलसाठी आरडाओरड केला. रहिवासी घरातील बहुतांश मजुरवर्ग कामावर गेला असल्याने एकदोनच घरात महिला होत्या, काही कळण्याआतच आगीचे लोट उठून एकामागून एक झोपड्यांची संपुर्ण रांग आगीच्या भक्षस्थानी सापडली. साडे दहा ते बारा वाजेच्या दरम्यान चौदा झोपड्यांमधील नऊ रहिवाश्‍यांचे घरसांसार आगीत सापडल्याने जागेवर जळालेल्या पार्टेशनचा कोळसा, छतांच्या पत्र्यांचा भंगार शेष उरला होता. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश जानगर पोलिस पार्टीसह घटनास्थळी दाखल झाले, तत्पुर्वीच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते, परिसरातील रहिवासी अग्नीशामकदलाच्या प्रयत्नातून दिडतास आग नियंत्रणात आली. शहर पोलिसांत या प्रकरणी अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे. 
 
बंद घरातून निघाला धुर 
रेल्वेत किल्ली कुलूप विक्री करुन उपजिवीका करणाऱ्या चेतन भगत सकाळीच कामावर निघून गेले, साडेदहा वाजेच्या सुमारास सर्वांत आधी त्यांच्याच घरातून धुराचे लोट निघाल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगीतले. पार्टेशनची घरे आणि त्यांना पावसाचे पाणी आत शिरुनये यासाठी लावण्यात आलेला प्लॅस्टीक कागद यामुळे काही सेकंदातच आगीचा भडका उडाला. एकमेकांना लागून असलेल्या पार्टेशनच्या खोल्या आग लागताच आगीच्या लोटात ओढल्या जावून प्रचंड भडका उडाला. पावणे अकराच्या सुमारास सिलेंडर स्फोट झाल्यावर मात्र रहिवाश्‍यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरुन धाव पळ उडाली होती. तशाही परिस्थीतीत गणेश आटोळे यांच्यासह एका खोलीतील पेटण्याच्या परीस्थीतीत असलेले दोन सिलेंडर बाहेर काढण्यात येवुन पाण्याचा मारा करण्यात आला. 
 
यांचे संसार जळून खाक 
कंडारे यांच्या जागेवर बांधलेल्या चौदा खोल्यांमध्ये चेतन भगत, आत्माराम पुंडलीक सोनार, रफिक शेख, शारदा विनोद मिसाळे, ज्ञानेश्‍वर पाटील, संजु मिस्त्री, विष्णू कोळी, ज्ञानेश्‍वर शिंपी, नरेश बाविस्कर आदी नऊ रहिवाश्‍यांचे संसारउपयोगी साहित्य, अन्नधान्य, घरातील थोडी थोडकी जमा-पुंजी, असे संपुर्णत:जळून खाक झाले असून घटनास्थळावर धातूच्या साहित्यांचे सांगाडे-भंगार आणि जळालेल्या साहित्यांचा कोळसा शिल्लक होता. 
 
मदतकार्यात तरुणांचा सहभाग 
मोलमजुरी कामगार वर्गाचा रहिवास असलेल्या भुरेमामलेदार प्लॉट भागात आगलागल्याचे माहिती पडताच शिवाजीनगरातील तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझवण्यासाठी शेजारील पक्‍क्‍या घरांच्या छतावरुन पाण्याचा मारा करण्यात येत होता. चौदा घरांचे पार्टेशन असलेल्या हे सर्व घरे चारही बाजुच्या पक्‍क्‍या घरांच्या बांधकामामुळे घेरले गेले असलेल्याने समोरुन आणि शेजारच्याच घरांवरुन पाण्याचा माराकरणे शक्‍य होते. मदतकार्य करणाऱ्या तरुणांना किरकोळ खर्चटल्या व्यतीरीक्त कोणसही दुखापत झाली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com