महिला सुरक्षेचा मुद्दा  अधिवेशनात प्रखरपणे मांडणार...आमदारांचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

 नाशिक ः राज्याच्या विधीमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तीनही आमदारांकडून शासनाने अडविलेला निधी मोकळा करण्याची मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांकडून औष्णिक विद्युत केंद्र व नाशिक सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्याची मागणी केली जाणार आहे. 

 नाशिक ः राज्याच्या विधीमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तीनही आमदारांकडून शासनाने अडविलेला निधी मोकळा करण्याची मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांकडून औष्णिक विद्युत केंद्र व नाशिक सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्याची मागणी केली जाणार आहे. 

गेल्या महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत बहुमत प्रस्तावासाठी एक अधिवेशन झाले. त्यानंतर दुसरे अधिवेशन सोमवार (ता.16) पासून नागपूर येथे सुरू होणार असून खऱ्या अर्थाने नागरिकांचे प्रश्‍न या अधिवेशनात मांडले जाणार आहे.

नक्की वाचा-....तर भाजप पुढे येईल

हैद्राबादच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक शहरातील मध्य, पूर्व, पश्‍चिम व देवळाली या चार विधानसभा मतदारसंघापैकी पूर्व वगळता तीनही मतदारसंघात महिला आमदार आहे. त्यामुळे हैदराबाद येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा मुद्दा या अधिवेशनात प्रखरपणे मांडला जाणार असल्याचे या आमदारांनी "सकाळ' कडे सांगितले. पूर्व व देवळाली मतदारसंघातील अनुक्रमे ऍड. ढिकले व आहिरे हे पहिल्यांदाचं निवडून आले असल्याने त्यांच्यासाठी अधिवेशन महत्वाचे आहे. अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची संधी आल्यास विकास कामांबरोबरचं महिला सुरक्षेच्या मुद्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती दिली. 

ड्राप सिस्टीम सुरु करा
महाविकास आघाडी सरकारने पुर्वी मंजुर करण्यात आलेला निधी थांबविला आहे. मध्य नाशिक मतदारसंघात अकरा कोटी रुपयांचा निधी थांबल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम झाल्याने या विषयावर विधानसभेत प्रश्‍न मांडणार आहे. त्याचबरोबर रात्रपाळीत काम करणाया महिलांना सुरक्षित घरी पोचण्यासाठी ड्रॉप सिस्टम सुरु करण्याची मागणी विधानसभेत केली जाईल.- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक. 

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने अडविल्याने या विषयावर भुमिका मांडावी लागेल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने महिला सुरक्षेसाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली जाईल. शहरी भागात सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे हि प्रमुख मागणी आहे.- सिमा हिरे, आमदार, नाशिक पश्‍चिम. 

महिला सुरक्षेच्या मुद्या बरोबरचं नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने मदत करावी, एकलहरा औष्णिक विज केंद्र पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी उर्जा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर लष्करी हद्दीपासून बांधकामांवर घालण्यात आलेली मर्यादा हा देखील एक महत्वाचा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे.

- सरोज आहिरे, आमदार, देवळाली. 

शासनाच्या नगरविकास विभागाने विकास कामांचा निधी अडविल्याने परिणामी काही कामे थांबली आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित निधी मागणार आहे. गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एटीएम लुट, घरफोड्या, महिलांची छेडछाड या घटना वाढल्याने हे विषय प्रकर्षणाने मांडणार- ऍड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पुर्व. 
-------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news city mla says women security