धानोऱ्यातील व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये लुटले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

धानोरा (ता.चोपडा) : चोपड्याहून शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी रक्‍कम घेवून येणाऱ्या महेंद्र चौधरी या व्यापाऱ्यास अडावदजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ तोंडाला रुमाल बांधलेले दोन तरूणांनी गाडी आडवी लावत हल्ला केला. तसेच चौधरी यांच्याजवळील अडीच लाख रुपयांची रक्‍कम लुटुन पसार झाले. सदर घटना सायंकाळी पाच- साडेपाचच्या सुमारास घडली. 

धानोरा येथील महेंद्र ट्रेडींग कंपनीचे मालक सुरेश चौधरी यांचा गावात भुसार मालाचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा महेंद्र हा दुपारी चोपडा येथे आपली गाडी (क्र एम. एच. 19 बीएल 3250) ने भुसार मालाचे (मक्‍याचे) पैसे घेण्यास गेला होता. त्याने चोपडा येथून अडीच लाख रुपये घेऊन येत होता. पाच- साडेपाचच्या सुमारास तो धानोराकडे येत असतांना अडावदजवळील बाजार समितीजवळ असलेले गतीरोधकाजवळ दोन तरुण गाडी आडवी लावत महेंद्रला दमदाटी केली. तसेच गाडीच्या पेट्रोल डिक्कीवर ठेवलेली पैशांची बॅगेला हिसका देत पडून गेले. सदर गाडीवर नंबर प्लेट नव्हती. दोन्ही तरुण अडावदमध्ये घुसताना महेंद्रने पाहीले. त्यांचा पाठलाग केला असतांना दोन बससमोर आल्यात. यामुळे ते दिसेनासे झाले. भांबावलेल्या अवस्थेत महेंद्र घरी येऊन घडलेला प्रकार सांगितला. गरीब परीस्थितीतून सुरेश चौधरी यांनी भुसारीचा व्यवसाय सुरू केला होता. यात हे संकट ओढवल्याने परिवार संकटात सापडला. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

परिसरात प्रथमच पैशे लुटीची घटना 
सुरेश चौधरी यांनी गरीबीतुन पुढे येत भुसार मालाचा व्यवसाय सुरू केला. सदर भुसार मालाचा व्यवसायात पडझडचा सामना करत दहा वर्षापासुन व्यवसाय करत आहेत. दरम्यान धानोरा येथील व्यापारी सुरेश चौधरी यांचा मुलगा महेंद्रकडून दोन लाख पन्नास हजार रुपये चोरट्यांनी हिसकावून नेल्याने परिसरातील पहिलीच घटना घडली. दिवसाढवळ्या झालेल्या लुटीमुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना आव्हानात्मक झाले आहे. 
 
Web Title: marathi news cjopda dhanora rastaloot