आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत दिरंगाई,  उपायुक्त, प्रभाग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मालेगाव,: शहरातील कॅम्प, सोयगाव भागात विविध विकासकामांचे फलक, कोनशिला, कमानी यांवरील राजकीय नेत्यांची नावे व मजकूर झाकला नाही. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे उपायुक्त व दोन प्रभाग अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते. येथील कॅम्प, सोयगाव, डी. के. चौक भागातील काही विकासकामांचे फलक बुधवारी (ता. 3) सायंकाळपर्यंत "जैसे थे' होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर ही कारवाई झाल्याचे समजते. ग्रामीण भागात काही सभामंडप, सभागृहांवरील नामफलक झाकण्यात न आल्याच्या तक्रारी आहेत.

मालेगाव,: शहरातील कॅम्प, सोयगाव भागात विविध विकासकामांचे फलक, कोनशिला, कमानी यांवरील राजकीय नेत्यांची नावे व मजकूर झाकला नाही. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे उपायुक्त व दोन प्रभाग अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते. येथील कॅम्प, सोयगाव, डी. के. चौक भागातील काही विकासकामांचे फलक बुधवारी (ता. 3) सायंकाळपर्यंत "जैसे थे' होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर ही कारवाई झाल्याचे समजते. ग्रामीण भागात काही सभामंडप, सभागृहांवरील नामफलक झाकण्यात न आल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात ग्रामसेवक व तलाठी आदींना आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: marathi news CODE OF CONDUCT