निट काम करा,अन्यथा निलंबनाला सामोरे जा,आयुक्त मुंढेची कर्मचाऱ्यांना तंबी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नाशिक : एक मे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. या दिनी कामगार, कर्मचाऱ्यांच्या शाबासकी देण्याचा दिवसं असला तरी नाशिक महापालिका मात्र अपवाद ठरले. या दिनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांवर फैलावर घेत थेट निलंबनाची धमकी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. आपल्याकडून काही चुकले का? चुकले असेल तर सर्वचं कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याचा काय कारण यासारख्या असंख्य प्रश्‍नांची सोडवणूक करताना कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिन साजरा झाला. 

  पालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिनाचे झेंडावंदन झाल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी मुख्यालयातील हिरवळीवर कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे राहण्याच्या सुचना विभाग प्रमुखांमार्फत दिल्या. कर्मचारी सरळ रेषेथ उभे राहिले जे उभे राहिले नाही त्यांना आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या भाषेत शिस्तीचे धडे देत सरळ रेषेत उभे केले. प्रारंभी मी तुम्हाला चहा पाजतो असे म्हटल्यानंतर कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. चहापान झाल्यानंतर मात्र आयुक्तांनी विभाग निहाय कर्मचायांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. पहिल्या फैरीत नगररचना विभागाला धारेवर धरले. 

येथील एका कर्मचाऱ्याने सचिव पातळीवरील नातेवाईकांकरवी मुंढे यांनी केलेल्या कारवाई मागे घेण्याचा संदर्भ देत. माझ्यावर दबाव आणण्याची गरज नाही. ज्यांना दबाव आणायचा असेल त्यांनी त्यांच्या घरी कामाला जावे असे खडसावतं कर्मचायांच्या वार्तालपाची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर आयुक्तांनी कर्मचाऱ्यांवर सुरु केलेली शाब्दीक बॉम्बफेक सुमारे तासभर सुरुचं होती. माझी कोणी बदली करू शकतं नाही. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा. मला हजर होवून नऊ तारखेला नव्वद दिवस होत आहेत. या दिवसातही तुमच्या कामकाजात सुधारणा दिसतं नाही त्यामुळे नव्वद दिवसानंतर निलंबनाची कारवाई करणार आहे. एकालाही काम करतां येत नाही त्यामुळे ऑनलाईन परिक्षा घेणार असून त्यात नापास झाल्यास निलंबनाला सामोरे जाण्याची धमकी दिल्याने कर्मचारी वर्ग हादरला आहे. 

अद्यापही काही कळेना 
आयुक्त मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना का फैलावर घेतले, आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत का? चुका झाल्या असतील तर थेट संबंधितांवर कारवाई करायला हवी. हजार, बाराशे कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याची गरज नव्हती. चुकी नसतानाही आयुक्तांच्या शब्दफेकीमुळे घायाळ झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही काय झाले ते कळतं नसल्याने अजूनही पालिका वर्तुळात महाराष्ट्र दिनी आयुक्तांच्या वर्तनाची चर्चा सुरु आहे. 
 
Web Title: Marathi news commissioner orders