शहराला चोवीस तास पाण्यासाठी जुनी मशिनरी बदलणार,आयुक्तांकडून केंद्राची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक : शहराला पाठीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रांना आज महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. जल शुद्धीकरण केंद्राचा कानाकोपऱ्याचे निरीक्षण करतांनाच आयुक्‍त थेट कार्यालयाच्या पत्रावर चढून स्थिती जाणून घेतली.

नाशिक : शहराला पाठीपुरवठा करणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्रांना आज महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. जल शुद्धीकरण केंद्राचा कानाकोपऱ्याचे निरीक्षण करतांनाच आयुक्‍त थेट कार्यालयाच्या पत्रावर चढून स्थिती जाणून घेतली.

पाणी पुरवण्याची प्रक्रिया समजून घेतांना, त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम सुधारण्याबाबतच्या सुचना दिल्या. या दौऱ्यात अडगळीत पडलेल्या जुन्या मशीन्सचाही लिलाव करण्याच्या सूचनेसह केंद्र सभोवतालच्या स्वच्छत ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात चोवीस तास पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले. 

सकाळी नऊला महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी बारा बंगला परीसरात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील विविध बाबींचे निरक्षण करतांना नोंदी घेतल्या. केंद्रसभोवतालच्या परीसरातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्‍त करतांना, सायंकाळपर्यंत स्वच्छता न झाल्यास कारवाईस सामोरे जावे, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचा महापालिकाचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्केडा यंत्रणा बसविण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे पाणी उपस्यापासून तर ग्राहकांना मिळेपर्यंतच्या प्रक्रियेत कुठे गळती होते, याचा शोध घेणे सोपे होणार असल्याचे श्री.मुंढे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान भेटी दरम्यान केंद्रावर आढळलेल्या जुनात मशीन्स लिलावात काढण्यात याव्यात, या सूचनेसह अन्य विविध सूचना आयुक्‍तांनी यावेळी केल्या. 

अन्‌ कर्मचाऱ्यांची धावपळ 
आयुक्‍तांनी अचानक जल शुद्धिकरण केंद्रांना भेटी दिल्याने अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपासून सगळ्यांची तारांबळ झाली. आयुक्‍त पाहणीसाठी आल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्याच एका कर्मचाऱ्यांनी मोकळ्या भागात पडलेली मद्याची बाटली उचलून एका बाजूला नेऊन ठेवली. आयुक्‍त केंद्रावर उपस्थित असेपर्यंत कर्मचाऱ्यांची घालमेल सुरू होती. 
 

Web Title: MARATHI NEWS COMMISSIONER TOUR