कॉंग्रेस भवनावर जप्तीची नामुष्की 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक- मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहिम सुरु केली असून मोहिमेचा फटका कॉंग्रेस कमिटीला बसला आहे. तब्बल 26 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने महापालिकेने जप्त केले असून 21 दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास कॉंग्रेस भवनाचा लिलाव करून त्यातून भरपाई करणार असल्याचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. कॉंग्रेस भवन बरोबरचं आयमा भवन, जिल्हा सहकार भवन सोसायटी व सार्वजनिक वाचनालय ईमारत जप्तीची नोटीस काढण्यात आली आहे. 

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर थकविणायांविरोधात जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 394 थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पुर्व विभागात 38, सातपूर विभागात 39, नाशिकरोड विभागात 157, पश्‍चिम विभागात 37, पंचवटी विभागात 73 तर सिडको विभागात 50 या प्रमाणे थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

मोठ्या थकबाकीदारांमध्ये जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा समावेश आहे. कॉंग्रेस भवनाच्या एकुण थकबाकीपैकी दोन वर्षांपुर्वी दहा लाख रुपये थकबाकी अदा करण्यात आली होती. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने तगादा लावला होता. अद्यापपर्यंत थकबाकी न भरल्याने अखेरीस मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आली असून थकबाकी अदा करेपर्यंत कॉंग्रेस भवन मध्ये कार्यक्रम घेता येता नाही व व्यवहार देखील करता येणार नाही. न्यायालयाने प्रॉपर्टी सील करण्यास बंदी घातल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

सार्वजनिक वाचनालय, आयमाला नोटीस 
कॉंग्रेस भवन प्रमाणेच शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या सार्वजनिक वाचनालयावर देखील जप्तीची नामुष्की आली आहे. 21 दिवसांच्या आत सात लाख 78 हजार रुपये थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव काढला जाणार आहे. उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयमा संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. चौदा लाख 74 हजार रुपये थकबाकी भरण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त पुर्व विभागात सागर बोंडे, जिल्हा सहकार भवन सोसायटी, अण्णा साहेब वाणी, सेवा ऑटोमोटीव्ह, सिकॉफ, रिलायन्स इन्फोकॉम. नाशिकरोड विभागात आयसीआयसीआय बॅंक, भगवान बिडवे, पश्‍चिम विभागात माथाडी कामगार मंडळ, देवज सुपर मार्केट, सिडको विभागात भारत संचार निगम लिमिटेडचे टॉवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 394 थकबाकीदारांकडून बारा कीो 46 लाख 88 हजार रुपये अपेक्षित आहे. आतापर्यंत चार लोकांनी पुर्ण थकबाकी तर 74 लोकांनी 84 लाख 79 हजार भागशा थकबाकी अदा केली आहे. 

महापालिकेने थकबाकी अदा करण्याची नोटीस दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रदेश पातळीवर पाठविण्यात आला असून त्यानंतर पालिकेची थकबाकीची रक्कम भरून कारवाई टाळणार आहे.- शरद आहेर, अध्यक्ष, शहर कॉंग्रेस. 
 
Web Title: marathi news congress acquirer