सरकारविरोधात कॉग्रेसची बोंबाबोंब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

जुने नाशिक: जिल्हा (ग्रामिण) कॉग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागातर्फे सरकारच्या विरोधात मेनरोड गाडगे महाराज (गामा) पुतळा येथे बोंबाबोंब आदोलन करण्यात आले. शासकिय कंत्राटी कामगार संबंधीत 9 फेब्रुवारी 2018 रोजी शासकनाकडून काढण्यात आलेले शासकीय परिपत्रक कंत्राटी कामागारांवर अन्याय करणारे असल्याचे सांगत परिपत्रकाचा विरोध करण्यात आला. 

सरकार रोज नवनवीन आदेश काढून घटनेची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत आहे. नोकऱ्यामधील आरक्षण संपविण्याचा घाट घालत आहे. तसेच नोकऱ्यांमध्ये ठेकेदारी पद्धती आणून ठेकेदाराना पोसण्याचे काम करत आहे. देशात व राज्यात केवळ हुमशाही पद्धतीने सरकार चालविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शासकिय कंत्राटी कामगार संबंधीत 9 फेब्रुवारी 2018 रोजी सरकारतर्फे शासकिय परिपत्रक काढण्यात आले आहे. परिपत्रकनुसार काढण्यात आलेल्या आदेशामुळे शासकिय कंत्राटी कामगारावर उपासमारीची वेळ येणार आहे. अशा परिपत्रका विरोध जिल्हा (ग्रामिण) कॉग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागातर्फे करण्यात येवून विभागाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्‍वर काळे यांच्या नेतृत्वात मेनरोड येथील गामा पुतळा परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, गिरीष मोहिते, कल्पना पांडे, वसंत ठाकुर, सुरेश मारु मिलिंद हांडोरे, शोभा गोंदणेकर, दिनेस उन्हवणे आदी उपस्थीत होते. 
 
Web Title: marathi news congress andolan